थडीपवनी ग्रामपंचायत चाैथ्यांदा राष्ट्रवादीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:58+5:302021-01-20T04:09:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : थडीपवनी (ता. नरखेड) ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल साेमवारी (दि. १८) जाहीर करण्यात आला. यात राष्ट्रवादी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : थडीपवनी (ता. नरखेड) ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल साेमवारी (दि. १८) जाहीर करण्यात आला. यात राष्ट्रवादी काॅंग्रेस समर्थित गटाने सर्वच अर्थात नऊही जागा जिंकल्या. त्यामुळे येथे विराेधी गटाला खाते उघडणेही शक्य झाले नाही.
थडीपवनी हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उपाजी उपाध्यक्ष बंडू उमरकर यांचे मूळ गाव असल्याने येथील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले हाेते. येथील एकूण नऊ जागांसाठी १९ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. यात राष्ट्रवादी काॅंग्रेस समर्थित गटाने नऊही जागा जिंकल्या असून, या गटाचे ग्रामपंचायतीवर सलग चाैथ्यांदा बहुमत मिळवित सत्ता संपादनाचा मार्ग माेकळा करण्याचा तालुक्यात विक्रम केला आहे.
माजी सरपंच तथा बंडू उमरकर यांच्या पत्नी नीलिमा उमरकर या वाॅर्ड क्रमांक-१ मधून ४६१ मतांनी विजयी झाल्या असून, याच वाॅर्डातून सुधाकर मरसकाेल्हे ४३० व लता पाेतदार ४३६ मतांनी विजयी झाल्या. वाॅर्ड क्रमांक-२ मधून नानाजी सोनुले ४३१ मतांनी, विजय पालीवाल ४२६ मतांनी, तर शीतल धावडे ४४४ मतांनी विजयी झाले. वाॅर्ड क्रमांक-३ मधून नंदकिशोर पुंड यांनी ३०० मतांनी साधना सोनुले यांनी ३०९ मतांनी, तर शालू गायनेर यांनी ३४६ मतांनी विजय संपादन केला.