दरवर्षी थॅलेसेमियाच्या १ लाख रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:33 PM2018-05-07T15:33:49+5:302018-05-07T15:34:19+5:30

थॅलेसेमिया ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दीड कोटीवर रुग्ण आहेत. यातील दरवर्षी एक लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या तीन कोटीवर आहे. यातील थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील एक लाख रुग्ण आहेत. या रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करायची असले तर या आजाराच्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, योग्य पद्धतीचा औषधे व सोयी मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक व बालरोग तज्ज्ञ डॉ.विंकी रुघवानी यांनी दिली.

Thalassemia deaths of 1 lakh patients annually | दरवर्षी थॅलेसेमियाच्या १ लाख रुग्णांचा मृत्यू

दरवर्षी थॅलेसेमियाच्या १ लाख रुग्णांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देविंकी रुघवानी याची माहिती : देशात एक लाख थॅलेसेमिया मेजर रुग्णजागतिक थॅलेसेमिया दिन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थॅलेसेमिया ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दीड कोटीवर रुग्ण आहेत. यातील दरवर्षी एक लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या तीन कोटीवर आहे. यातील थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील एक लाख रुग्ण आहेत. या रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करायची असले तर या आजाराच्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, योग्य पद्धतीचा औषधे व सोयी मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक व बालरोग तज्ज्ञ डॉ.विंकी रुघवानी यांनी दिली.
जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या पूर्वसंध्येवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद सांधला. डॉ. रुघवानी म्हणाले, ही आनुवंशिक व्याधी आहे. थॅलेसेमियाचे तीन प्रकार आहेत. या आजाराची व्यक्ती वाहक असते, इंटरमिडीया असते व मेजर (घातक) असते. दोन ‘थॅलेसिमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्ये अत्यंत थॅलेसीमिया मेजर पीडित होऊ शकते.
लहान मुलांमध्ये हिमोग्लोबीनची निर्मिती थांबते व त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. अशा स्थितीतील हा आजार गंभीर असतो. यात प्रामुख्याने लोहाची कमतरता आढळते. दुसरीकडे वारंवार रक्त दिल्याने लोहाची मात्रा आवश्यक्तेपेक्षा जास्त वाढते. देशात काही जाती-जमातींमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ३ ते ४ टक्के रुग्ण हे थॅलेसेमियाचे वाहक असतात. २५ लोकांमधून थॅलेसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला साधारण थॅलेसेमिा मेजर १२ हजार बाळ जन्माला येतात. हे थांबविणे सहज सोपे असलेतरी याबाबत फारसी जनजागृती नाही, अशी खंतही डॉ. रुघवानी यांनी बोलून दाखवली.
-मेजर व्याधीचे स्वरूप
अ‍ॅनेमियाचीच ही एक व्याधी आहे. या रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबीनची निर्मिती होत नाही. जन्मत:च अशी मुले सामान्यत: सारखीच असतात. वयाच्या तीन ते १८ व्या महिन्यात मुलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात. या मुलांची त्वचा पिवळट दिसते. मुले नीट खात-पीत नाहीत. उलट्यांचे प्रमाण वाढते. परिणामी पुढील आठ वर्षांमध्ये रुग्णाला मृत्यू होऊ शकतो. या रोगावर ‘अस्थीमज्जा प्रत्यारोपण’ (बोनमॅरो ट्रान्सप्लांट) हा उपचार आहे. परंतु देशात मोजक्याच ठिकाणी हा उपचार होतो.

Web Title: Thalassemia deaths of 1 lakh patients annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.