महागाई विरोधात थाळीनाद

By admin | Published: October 28, 2015 03:24 AM2015-10-28T03:24:04+5:302015-10-28T03:24:04+5:30

केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणार, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते.

Thalinad against inflation | महागाई विरोधात थाळीनाद

महागाई विरोधात थाळीनाद

Next

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक : डाळींचे भाव कमी करा
नागपूर : केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणार, असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहे. तूर डाळ प्रति किलो २०० रुपयावर गेली आहे. महागाईमुळे गरीब माणूस उद्ध्वस्त झाला आहे.
नापिकी व शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. राज्यातील युती सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंगळवारी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी आकाशवाणी चौकात ‘थाळीनाद’आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री व शहर अध्यक्ष अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
दिवाळीचा सण जवळ आला असताना डाळी व खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडले आहे. केंद्रात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत असताना तूर डाळीचे भाव ९० रुपयावर गेले होते. परंतु भाववाढ कमी करण्यासाठी एक लाख मेट्रिक टन तूरडाळ आयात क रून सवलतीच्या दरात ५५ रुपये किलो भावाने राज्यातील रेशन दुकानातून उपलब्ध केली होती. असा ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच शेतकरी अडचणीत असल्याने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी महिलांनी थाळीनाद करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत असून महागाई आकाशाला भिडल्याने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. आघाडी सरकारच्या काळात लोकांना ५५ रुपये किलो दराने डाळ उपलब्ध केली होती. परंतु भाववाढीला आळा घालण्यासाठी युती सरकार कोणतेही निर्णय घेत नसल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार दीनानाथ पडोळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुटे, ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख, माजी अध्यक्ष अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, बंडू उमरकर, राजु नागुलवार, प्रगती पाटील, दुनेश्वर पेठे,राजेश कुंभलकर, रमन ठवकर, मुन्ना तिवारी, तनुज चौबे, नूतन रेवतकर, शब्बीर विद्रोही, विशाल खांडेकर, बजरंगसिंग परिहार, माधुरी कुसुंबे, कामिल अंसारी,अशोक राऊ त, अशोक काटले, ज्ञानबा मसके, मिलिंद मानापुरे, राजू जैन, ईश्वर बाळबुधे, सुरेश धनवानी, तारामती रहागुडे, कल्पना मानकरआदी उपस्थित होते.
चित्रा वाघ व अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन दिले.(प्रतिनिधी)

Web Title: Thalinad against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.