९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात; साहित्य महामंडळाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 04:18 PM2022-05-30T16:18:20+5:302022-05-30T16:25:42+5:30

हे संमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येईल, असे महामंडळ अध्यक्ष उषा तांबे यांनी सांगितले.

the 96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan to be held in wardha | ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात; साहित्य महामंडळाची घोषणा

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात; साहित्य महामंडळाची घोषणा

googlenewsNext

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष उषा तांबे यांनी रविवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केली.

विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष सुरू असल्याने ९६वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्ती केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलन स्थळासाठी सुचविले होते. त्याअनुषंगाने, शनिवारी महामंडळाच्या स्थळ निवड समितीने वर्धा स्थळाला भेट दिली. तेथील मैदाने, वाहनतळ, पुस्तक प्रदर्शनांचे स्थळ आणि निवास व्यवस्था यांची पाहणी केली. पाहणीनंतर ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वर्धा हे स्थळ योग्य असल्याचा अहवाल स्थळ निवड समितीने रविवारी विदर्भ साहित्य संघात झालेल्या बैठकीत दिला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. हे संमेलन जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येईल, असे उषा तांबे यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सचिव उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे व विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांची उपस्थिती होती. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, वर्धेचे शाखा समन्वयक प्रदीप दाते, अकोल्याचे डॉ. गजानन नारे, डॉ. विद्या देवधर, कपूर वासनिक, पुण्याचे प्रकाश होळकर, औरंगाबादचे किरण सगर यांचीही उपस्थिती होती.

Web Title: the 96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan to be held in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.