अपघातग्रस्त बसने केला होता ११वेळा नियमांचा भंग; क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविल्याचाही होता दंड    

By सुमेध वाघमार | Published: July 1, 2023 05:52 PM2023-07-01T17:52:39+5:302023-07-01T17:54:48+5:30

Buldhana Bus Accident : ७ चालान अजूनही प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती

The accident bus had violated the rules 11 times; there was also a penalty for carrying more passengers than the capacity | अपघातग्रस्त बसने केला होता ११वेळा नियमांचा भंग; क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविल्याचाही होता दंड    

अपघातग्रस्त बसने केला होता ११वेळा नियमांचा भंग; क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविल्याचाही होता दंड    

googlenewsNext

नागपूर : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा येथे शनिवारी पहाटे १.३२ वाजताच्या सुमारास भिषण अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स बसने ११ वेळा वाहतूक नियमांचा भंग केल्याचे पुढे आले आहे. त्यातील ७ चालान अद्यापही प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे.

‘विदर्भ ट्रॅव्हल्स’ची ‘एमएच २९ बीई १८१९’ क्रमांकाची बसची नोंदणी २४ जानेवारी २०२० रोजी आरटीओकडे झाली. १० मार्च २०२३ रोजी आरटीओकडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले. हे सर्टिफिकेट १० मार्च २०२४ पर्यंत वैद्य आहे. फिटनेस तपासणीत वेग नियंत्रक यंत्रही सुस्थितीत असल्याची नोंद आहे. परंतु आरटीओकडून वेळोवेळी झालेल्या तपासणीमध्ये अपघातग्रस्त बसला ११ चालान देण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, चालानमध्ये क्षमतेपक्षा जास्त प्रवाशांना बसविण्याचे तीन ते चार चालान आहेत. या शिवाय, चालक युनिफॉर्ममध्ये नसणे, विंड स्क्रिनमध्ये दोष, टॅक्स संबंधातीलही चालान आहेत. 

Buldhana Bus Accident : बस चालकाला डुलकी लागली अन् २५ प्रवाशांचा होरपळून जीव गेला 

- फिटनेस सर्टिफिकेट कोणी दिले

अपघातग्रस्त बसने १० मार्च २०२३ रोजी फिटनेस चाचणी दिली. परंतु फिटनेस प्रमाणपत्रावर संबंधित मोटार वाहन निरीक्षकाचे नाव नाही. फिटनेस प्रमाणपत्र १० मार्च २०२४ पर्यंत वैद्य आहे. यामुळे या प्रमाणपत्रावरही संशय निर्माण केला जात आहे. 

- अग्नीक्षमण यंत्रणेची तपासणी झाली होती का?

आरटीओने या बसच्या केलेल्या पाहणीत अग्नीक्षमण यंत्राची तपासणी के ली होती का, ते सूस्थितीत होते का, आप्तकालीन स्थितीत काच फोडण्यासाठी लागणारी हातोडी जागेवर होती का, या सर्व गोष्टी आरटीओने दिलेल्या ११ चालानमध्ये नसल्याची माहिती आहे. बसवर एवढे चालान असताना हे प्रकरण  न्यायालयात सादर का केले नाही, असे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.

Web Title: The accident bus had violated the rules 11 times; there was also a penalty for carrying more passengers than the capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.