पेट्रोलिंग करताना ताब्यात घेतलेला आरोपी निघाला मोक्का कारवाई झालेला गुन्हेगार

By योगेश पांडे | Published: September 12, 2023 05:20 PM2023-09-12T17:20:16+5:302023-09-12T17:20:53+5:30

गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाची कारवाई

The accused who was detained while patrolling turned out to be a convicted criminal | पेट्रोलिंग करताना ताब्यात घेतलेला आरोपी निघाला मोक्का कारवाई झालेला गुन्हेगार

पेट्रोलिंग करताना ताब्यात घेतलेला आरोपी निघाला मोक्का कारवाई झालेला गुन्हेगार

googlenewsNext

नागपूर : पेट्रोलिंग करताना ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा मोक्का कारवाई झालेला गुन्हेगार निघाला. तो मागील काही काळापासून फरार होता. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना एक फरार आरोपी शस्त्र घेऊन फिरत असल्याची खबऱ्यांच्या नेटवर्कमधून माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून वाठोडा परिसरातील एका पानठेल्यासमोरून चंद्रशेखर उर्फ चंदू अरुण कावरे (२७, तेलीपुरा, वसंतनगर, अजनी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून चाकू निघाला.

पोलिसांनी त्याचा रेकॉर्ड तपासला असता तो सराईत गुन्हेगार निघाला. त्याच्यावर खंडणीवसुली, हत्येचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल होते व मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तो अनेक दिवसांपासून फरार होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून मोबाइल जप्त करत पुढील कारवाईसाठी त्याला नंदनवन पोलिस ठाण्याच्या पथकाच्या हवाली केले. पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के, अविनाश जायभाये, वैभव बारंगे, सुनील ठवकर, देवेंद्र नवघरे, पुरुषोत्तम काळमेघ, दीपक चोले, चेतन पाटील, श्रीकांत मारवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: The accused who was detained while patrolling turned out to be a convicted criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.