सव्वालाख कोटींच्या खयवाडीचे टार्गेट ठेवून बुकींकडून सट्टाबाजार गरम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:12 PM2024-06-01T23:12:28+5:302024-06-01T23:12:39+5:30

निवडणूकीचा सट्टा सव्वालाख कोटींच्या घरात जाणार असल्याची चर्चा आहे.

The betting market is heated by the bookies with a target of 1.5 lakh crores of Khayawadi | सव्वालाख कोटींच्या खयवाडीचे टार्गेट ठेवून बुकींकडून सट्टाबाजार गरम

सव्वालाख कोटींच्या खयवाडीचे टार्गेट ठेवून बुकींकडून सट्टाबाजार गरम

नरेश डोंगरे, नागपूर : आयपीएल क्रिकेट सामन्याच्या सट्टेबाजीत मशगुल असल्याने लोकसभा निवडणूकीच्या सट्टेबाजीकडे दुर्लक्ष करणारे बुकी गुरुवारपासून खुलून मैदानात उतरले आहेत. एकीकडे वृत्त वाहिन्यांकडून एक्झिट पोल दाखविले जात असतानाच बुकींनी शुक्रवारी नवे रेट देऊन सट्टाबाजार गरम केला आहे. खास सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी निवडणूकीचा सट्टा सव्वालाख कोटींच्या घरात जाणार असल्याची चर्चा आहे.


कोट्यवधींची मलाई मिळत असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने देश-विदेशातील सट्टेबाजीसाठी पर्वणी ठरते. त्यामुळे यावेळी आयपीएलची घोषणा होताच देश-विदेशातील बुकींनी ७४ सामन्यांच्या माध्यमातून लाखो कोटींची खयवाडी केली. दरम्यान, आयपीएलमध्ये गुंतल्याने लोकसभा निवडणूकीच्या खयवाडीपासून अनेक बुकी दूर होते. मात्र, रविवारी आयपीएलचे फायनल झाले अन् लबालब झालेल्या बुकींनी चार-पाच दिवस 'रेस्ट झोन'मध्ये काढल्यानंतर गुरुवार-शुक्रवारपासून पुन्हा त्याच जोमाने डावबाजी सुरू केली. आज १ जूनला लोकसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले असताना ४ जूनवर लक्ष केंद्रीत करून बुकींनी सट्टाबाजार चांगलाच गरम केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीवर ९७ हजार कोटींचा सट्टा लागल्याची चर्चा होती. यावेळी २०२४ ला बुकींनी सव्वालाख कोटींच्या सट्ट्याचे (खयवाडीचे) टार्गेट ठेवल्याची चर्चा आहे.
 
फरक क्रिकेट अन् निवडणूकीच्या सट्टेबाजीचा

क्रिकेट सट्टा अन् निवडणूक सट्ट्यात खूप फरक आहे. क्रिकेटच्या सामनावर देश-विदेशात सट्टा लावला, खाल्ला जातो. त्यामुळे बुकी,पंटर आणि सट्टेबाजीत लागणारी रोकड प्रचंड मोठी असते. निवडणूकीचा सट्टा हा त्या-त्या विभागात, प्रांताशी संबंधित असल्याने खाणारे आणि लावणारे कमी असतात. रक्कमेचा आकडाही कमीच असतो. क्रिकेटच्या सट्टेबाजीत वेळ कमी अन् पैसा अधिक तर निवडणूकीच्या सट्टेबाजीत वेळ जास्त अन् पैसा कमी असतो.

तुमडी भरण्यासाठीच गेमबाजी

निवडणूकांच्या बाबतीत सटोड्यांची ही गेमबाजी केवळ त्यांची तुमडी भरण्यासाठीच असते. कारण त्यांच्याकडे दीड दोन महिन्यांचा अवधी असतो. त्यामुळे प्रारंभी ते भलतेच भाकित वर्तवितात. त्यानुसार,या भाकितावर सटोडे मोठा रकमेचा सट्टा लागतो. नंतर ते हळूहळू अंदाज बदलवून सट्टेबाजांची रोकड आपल्या तिजोरीत वळती करतात.
सटोड्यांनी २०१९ मध्ये भाजपाला बहुमत मिळणार असे भाकित वर्तविले होते. आता २०२४ मध्येही सटोड्यांनी भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असाच अंदाज वर्तविला आहे. मात्र, निवडणूकीच्या पहिल्या आणि अंतिम टप्प्यातील सटोड्यांच्य गणितात खूप फरक (सटोडे त्याला कलर म्हणतात!) आला आहे. आता सटोडे चलबिचल अवस्थेत दिसत आहेत.

सट्टा बाजाराचा सध्याचा कल
संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी सट्टा बाजाराने भाजपाला २५० सिटासाठी ६ पैसे (२५० सिटस् आल्या तर एक लाख रुपये लावणाराला ६ हजार रुपये मिळणार) भाव दिला आहे. २७५ सिटस् वर २० पैसे, ३०० सिट्सवर ५५ पैसे तर ३०६ सिट्सवर १ रुपया भाव दिला आहे. 

Web Title: The betting market is heated by the bookies with a target of 1.5 lakh crores of Khayawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर