मेडिकल चौकात कार पेटली! ‘शाॅर्टसर्कीट’चा अंदाज
By मंगेश व्यवहारे | Published: March 9, 2024 03:28 PM2024-03-09T15:28:24+5:302024-03-09T15:28:35+5:30
गेल्यावर्षीही शहरात उन्हाळ्याच्या दिवसात अनेक वाहनांना आगी लागल्याच्या घटना घडल्या होत्या
नागपूर : शहरात तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी उन्हाचा फटका मेडिकल चौकात उभ्या असलेल्या एका कारला बसला. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने कारने चांगलाच भडका घेतला. त्यामुळे मेडिकल चौकात पळापळ सुरू झाली.
लोकांनी लगेच अग्निशमन विभागाला सूचना केली आणि आगही विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच अग्निशमनच्या कॉटन मार्केट स्टेशनवरून गाडी घटनास्थळावर पोहचली. अग्निशमन विभागाच्या पथकाने लगेच कारवाई करून आग विझविली. गेल्यावर्षीही शहरात उन्हाळ्याच्या दिवसात अनेक वाहनांना आगी लागल्याच्या घटना घडल्या होत्या. महापालिकेच्या आपली बस सेवेतील दोन बसेसलाही गेल्यावर्षी आग लागली होती. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. परंतु ऑटोमोबाईल तज्ञ निखिल उंबरकर यांच्या मते कारमध्ये झालेल्या शॉर्ट सक्रीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.