बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत

By योगेश पांडे | Published: August 15, 2024 12:19 PM2024-08-15T12:19:01+5:302024-08-15T12:19:48+5:30

संघ मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा...

The Center should take steps to protect the suffering Hindus in Bangladesh says Sarsanghchalak Mohan Bhagwat | बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत

बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण व्हावे, केंद्राने पावले उचलावीत - सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : बांगलादेशमधीलहिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. बांगलादेशमधील पीडित हिंदूंचे संरक्षण झाले पाहिजे. केंद्राने त्यांच्या पातळीवर पावले उचलावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्यांचा हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

भारताची परंपरा राहिली की आहे, आपण जगाच्या उपकाराकरता उभे राहतो. त्यामुळे आपण कधीच कोणावर आक्रमण केले नाही.जो संकटात होता त्याला मदतच केली. तो आपल्या सोबत कसा व्यवहार करतो हे बघितले नाही. जगभरातील पिडितांकरता आपण हे करतो. सरकार हे करत असते. शेजारील देशांमध्ये जी अस्थिरता आहे, त्यामुळे अनेकांना अराजकता झेलावी लागत आहे. त्या उत्पाताचा हिंदूंना त्रास होत आहे. त्यांना काही कष्ट होऊ नये, त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नये, याची जबाबदारी एक देशाच्या नाते आपल्यावर आहेच. काही गोष्टी सरकारने आपल्या स्तरावरच कराव्या, असे सरसंघचालक म्हणाले. 

जगात अनेक लोक आहेत की ज्यांना अन्य देशांवर वर्चस्व गाजवायचे आहे. त्याकरता आपण सजग रहायचे आहे. आपल्यावर देशाच्या स्व ची रक्षा आणि स्वातंत्र्याची जबाबदारी आहे. त्यासाठी सामान्य समाजाने सुद्धा सजगता ठेवावी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तशी मनोवृत्ती ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.


नवीन पिढीने स्वातंत्र्याची रक्षा करावी -
केवळ चिंतन करून होत नाही. स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. १८५७ नंतर ९० वर्षाचा संघर्ष चालला. अनेक प्रकारचे लोक त्यात सहभागी झाले .आपल्या देशात प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य नायक झाले. अगदी सामान्य व्यक्तीदेखील स्वातंत्र्याकरता रस्त्यावर उतरला. अनेकजण जेलमध्ये गेले अनेक अनेकांना अनेकदा कारावास झाला. बलिदान करणारा समूह आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा समाज यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आता येणाऱ्या पिढीला स्वतंत्रता   रक्षा करायची आहे, असे डॉ.भागवत म्हणाले.

Web Title: The Center should take steps to protect the suffering Hindus in Bangladesh says Sarsanghchalak Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.