कांदाप्रश्नी राज्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली
By कमलेश वानखेडे | Updated: May 4, 2024 18:31 IST2024-05-04T18:26:30+5:302024-05-04T18:31:31+5:30
देवेंद्र फडणवीस : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार

Devendra Fadanvis on Onion Export
नागपूर : कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी राज्य सककारकडून वारंवार केली जात होती. या मागणीची केंद्र सरकारने दखल घेतली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
शनिवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी, आम्ही तिघेजण केंद्र सरकारच्या पाठीमागे यासाठी लागून होतो. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची बाब आम्ही केंद्र सरकारला कळवली होती. त्याला प्रतिसाद मिळाला. एकीकडे देशात कांद्याचे उत्पादन कमी असताना तो निर्यात झाला. देशात कांद्याची कमतरता झाली तर बाहेर देशातून आयात करावा लागतो. विरोधकांनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे व सामान्य माणसाचे हीत पाहत आहे, असेही फडणवीस म्हणाले.