मुख्यमंत्री करणार ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 08:46 PM2023-01-25T20:46:17+5:302023-01-25T20:48:21+5:30

Nagpur News वर्धा येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान आयोजित९६ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

The Chief Minister will do the 96th A. Bh. Inauguration of Marathi Literature Conference | मुख्यमंत्री करणार ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

मुख्यमंत्री करणार ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्दे९०० कवी करणार कवितेचा जागरपरिसंवाद, मुलाखत, मुक्तसंवाद, ग्रंथप्रदर्शन

नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघातर्फे आयाेजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४ व ५ फेब्रुवारीला वर्धा येथे हाेऊ घातले आहे. संमेलन स्थळाला राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी असे नाव देण्यात आले असून येथील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर ३ फेब्रुवारी राेजी सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन हाेईल.

वि. सा. संघाचे अध्यक्ष व संमेलन आयाेजन समितीचे संयाेजक प्रदीप दाते यांनी आयाेजनाबाबतची माहिती बुधवारी पत्रपरिषदेत दिली. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेत हाेणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पूर्वाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डाॅ. विश्वनाथप्रसाद तिवारी, कवी डाॅ. कुमार विश्वास, भारती विद्यापीठ, पुण्याचे कार्यवाह आमदार डाॅ. विश्वजित कदम, डाॅ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघणार असून त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे या ध्वजाराेहण करतील. मुख्य सभामंडपाला आचार्य विनाेबा भावे यांचे नाव देण्यात आले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, परिचर्चा, मुलाखत, मुक्तसंवाद, ग्रंथप्रदर्शन तसेच कविसंमेलनाचे आयाेजन करण्यात आले असून कविकट्टा, गझलकट्ट्याच्या माध्यमातून राज्यातील ९०० च्यावर कवी कवितांचा जागर करणार आहेत. ४ फेब्रुवारीला सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अभय बंग यांची मुलाखत आणि सायंकाळी चित्रपट दिर्ग्दशक नागराज मंजुळे व कवी किशाेर कदम ‘साैमित्र’ यांचा सहभाग असलेला मुक्त संवाद कार्यक्रम हाेईल. पहिल्या दिवशी कर्मयाेगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबाेधन परंपरा या विषयासह तीन दिवस विविध विषयांवर परिसंवाद व परिचर्चा हाेणार आहे. या संमेलनात एक लाखावर साहित्यप्रेमी उपस्थित हाेतील, असा दावा प्रदीप दाते यांनी केला आहे.

संमेलनापूर्वी ग्रंथप्रदर्शन

संमेलनापूर्वी २ फेब्रुवारी राेजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरीत भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आणि ग. त्र्यं. माडखाेलकर प्रकाशन मंचाचे उद्घाटन हाेईल. १ फेब्रुवारीला सायंकाळी प्रबाेधनकार सत्यपाल महाराज यांच्या भजन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे.

वाहन व्यवस्था आहे, पण स्वखर्चाने या

नागपुरातून संमेलनासाठी वर्धेला जाणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी वि. सा. संघाने झाशी राणी चाैकातून वाहनाची व्यवस्था केली आहे. सकाळी ८ व ९ वाजता बसेस साेडण्यात येतील व रात्री ८ व ९ वाजता परत येता येईल. मात्र नागपूर ते वर्धा प्रवासासाठी २०० रुपये आकारले जात आहेत. वास्तविक एसटीचे तिकीट १६० रुपये आणि ट्रॅव्हल्स कंपन्या या प्रवासासाठी १०० रुपये आकारतात. वि. सा. संघाने दुप्पट आकारले आहेत. त्यामुळे हा संघाद्वारे संमेलनाचा खर्च काढण्याचा तर प्रयत्न नाही, अशी चर्चा हाेत आहे.

शासनाने दिले २५ लाख

संमेलनाच्या आयाेजनासाठी राज्य शासनाकडून निधी मिळाला नसल्याची चर्चा हाेती. मात्र सरकारने ५० टक्के म्हणजे २५ लाख रुपये निधी प्राप्त झाल्याचे प्रदीप दाते यांनी सांगितले. याशिवाय स्थानिक आमदारांकडूनही मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे, पण निवडणूक आचार संहितेमुळे ते थांबले असल्याचे दाते यांनी सांगितले.

Web Title: The Chief Minister will do the 96th A. Bh. Inauguration of Marathi Literature Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.