ठेकेदाराला मारहाण करून लुटले, कळमन्यातील घटना

By योगेश पांडे | Published: April 25, 2023 04:31 PM2023-04-25T16:31:53+5:302023-04-25T16:33:08+5:30

आरोपींविरोधात गुन्हा नोंद

The contractor was beaten and robbed in Kalamna of nagpur | ठेकेदाराला मारहाण करून लुटले, कळमन्यातील घटना

ठेकेदाराला मारहाण करून लुटले, कळमन्यातील घटना

googlenewsNext

नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आरोपींनी एका ठेकेदाराला मारहाण करत लुटले. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

सुकेश रामटेके (४९,चित्रशाला माता नगर) हे सकाळी दुचाकीने भिलगाव येथे कामावर गेले होते. दुपारी साडेबारानंतर जेवणासाठी परत येत असताना माकडे ले आऊटच्या मैदानात त्यांना दोन मुलांनी अडविले. त्यातील कुलजितसिंह उर्फ बब्बू पाजी (२१, चित्रशाला नगर) याला ते ओळखत होते. आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली व खिशात जे काही असेल ते बाहेर काढण्यास सांगितले.

आरोपींनी त्यांच्या खिशातून मोबाईल व रोख रक्कम हिसकावली. त्यानंतर रामटेके यांनी दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर आरोपींनी विटांनी हल्ला केला. यात ते जखमी झाले. आरोपी परत मारहाण करत असताना रामटेके यांनी आरडाओरड केली. तेव्हा त्यांच्या वस्तीतील दोन लोक मदतीसाठी धावून आले. त्यांना पाहून आरोपी फरार झाले. रामटेके यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The contractor was beaten and robbed in Kalamna of nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.