लोखंडी तराफे ‘टार्गेट’ करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक

By योगेश पांडे | Published: June 15, 2023 05:50 PM2023-06-15T17:50:24+5:302023-06-15T17:51:21+5:30

६३ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने व १.३० लाखांचे लोखंडी तराफे जप्त

The crime branch arrested the inn thieves who 'targeted' the iron rafts | लोखंडी तराफे ‘टार्गेट’ करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक

लोखंडी तराफे ‘टार्गेट’ करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक

googlenewsNext

नागपूर : चार ठिकाणी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

वंदना कमलेश उके (५३, नाईक तलाव) या त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून १.८८ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता व गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता. खबऱ्यांच्या मार्फत पोलिसांना या घरफोडीत हर्ष उर्फ छोटू योगेश डेहरिया (१९, धम्मदीपनगर) व मयंक उर्फ चरसी कुंवरसिंह शाहू (२२, विटाभट्टी चौक) यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी लोखंडी तराफे चोरी केल्याची तसेच मानकापूर हद्दीत एका ठिकाणी लोखंडी तराफे चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ६३ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने व १.३० लाखांचे लोखंडी तराफे जप्त करण्यात आले. आरोपींना पुढील तपासासाठी पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाच्या हवाली करण्यात आले आहे.

Web Title: The crime branch arrested the inn thieves who 'targeted' the iron rafts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.