ड्रिलिंग मशीनवाला गेला अन् 'त्या' हत्याकांडाचे बिंग फुटले; दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 03:11 PM2022-07-25T15:11:43+5:302022-07-25T15:16:21+5:30

पैशाच्या उधारीवरून वाद विकोपाला गेला आणि यातून हा गेम झाला, असे प्रथमदर्शनी तपासाअंती पोलीस सांगत आहेत. तरीही या हत्याकांडाबाबत विविध चर्चेला पेव फुटले आहे.

The drilling machine guy went and the umred massacre unfolded, two accused arrested | ड्रिलिंग मशीनवाला गेला अन् 'त्या' हत्याकांडाचे बिंग फुटले; दोन आरोपींना अटक

ड्रिलिंग मशीनवाला गेला अन् 'त्या' हत्याकांडाचे बिंग फुटले; दोन आरोपींना अटक

googlenewsNext

उमरेड (नागपूर) : एका आरोपीने मृताचे दोन्ही पाय पकडून ठेवले. दुसऱ्याने चाकूने गळा चिरला. पोटावर वार केले. त्यानंतर आरोपीने एका ड्रिलिंग मशीनवाल्याला प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी बोलावले. ड्रिलिंग मशीनवाल्याने भीतिपोटी तात्पुरता होकार दर्शविला. त्यानंतर ड्रिल मशीनवाला घटनास्थळावरून थेट पाेलीस ठाण्यात पोहोचला आणि उमरेड इतवारी पेठ येथील हत्याकांडाचे बिंग फुटले. अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रकार शनिवारी (दि.२३) उमरेडच्या इतवारी पेठेतील दाट वस्तीत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उजेडात आला.

उमरेड पोलिसांनी या हत्याकांडातील दोन आरोपींना अटक केली आहे. रोशन सदाशिव कारगावकर (२९, रा. इतवारी पेठ, उमरेड) व बाल्या ऊर्फ बादल मोरेश्वर लेंडे (२४, रा. आमगाव देवळी), अशी आरोपींची नावे आहेत. शुभम ऊर्फ गोलू भोजराज दमडू (२५, रा. इतवारी पेठ, उमरेड), असे मृताचे नाव आहे. मृताचा गळा चिरण्यात आला. त्यानंतर पोटावर जवळपास दहा घाव असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी दिली. आरोपी रोशनच्या घरी पोत्याच्या माध्यमातून एका ड्रममध्ये प्रेत लपवून ठेवल्याचीही बाब समोर आली आहे. पैशाच्या उधारीवरून वाद विकोपाला गेला आणि यातून हा गेम झाला, असे प्रथमदर्शनी तपासाअंती पोलीस सांगत आहेत. तरीही या हत्याकांडाबाबत विविध चर्चेला पेव फुटले आहे.

मृत शुभम दमडू हा एका मोबाइल शॉपीमध्ये काम करीत होता. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तो आपल्या राहत्या घरी गेला. दरम्यान, आरोपी रोशन कारगावकर हा आपल्या घरी अन्य आरोपी बाल्या लेंडे याच्यासोबत होता. शुभम रोशनच्या घरी पोहोचला. काही वेळ बसला. अशातच रोशनने शुभमला पकडून ठेवले आणि बाल्या ऊर्फ बादलने चाकूने वार केले.

या संपूर्ण हत्याकांडानंतर बाल्या ऊर्फ बादल हा पळून गेला. दुसरीकडे घराला कुलूप लावत रोशनने बाजारातून पोते विकत आणले. सोबतच एका ड्रिल मशीनवाल्याला घरी बोलावून घेतले. मृतदेहाची विल्हेवाट लावायची असल्याचे सांगितले. या ड्रिल मशीनवाल्याने बचावात्मक पवित्रा घेत तात्पुरता होकार दिला. त्यानंतर ड्रिल मशीनवाल्याने पोलिसांना याबाबत सूचना दिली आणि या हत्याकांडाचे पितळ उघडे पडले. उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे करीत आहेत. 

ड्रिलिंगवाल्यास बाेलावले कशासाठी?

आरोपी रोशन कारगावकर याने बाजारातून पोते विकत घेतले होते. शिवाय, ड्रिलिंग मशीनवाल्यास घटनास्थळी बोलावले. तो शुभमच्या मृतदेहाचे काय करणार होता आणि त्याने ड्रिलिंग मशीनवाल्याला कशासाठी बोलविले होते, याचाही शोध पोलीस तपासात उजेडात येणार आहे.

मुंबईला पळून जाताना धावत्या ट्रेनमध्ये आरपीएफने बांधल्या मुसक्या

वस्तीतील तरुणाची हत्या करून मुंबईला पळून जाणाऱ्या उमरेडच्या एका आरोपीच्या धावत्या ट्रेनमध्ये आरपीएफने मुसक्या बांधल्या. नंतर त्याला अकोला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. रोशन कारगावकर असे आरोपीचे नाव आहे.

रोशनने त्याच्या वस्तीत राहणाऱ्या एका तरुणाची शनिवारी दुपारी हत्या केली आणि त्याच्या जवळचा ऐवज लुटून तो फरार झाला. तो नागपूर रेल्वेस्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीने पळून जात असल्याचे कळताच ग्रामीण पोलिसांनी आरपीएफला मदत मागितली. त्यानुसार, पोलीस आणि आरपीएफच्या वरिष्ठांनी तो ट्रेन नंबर १२८३४ च्या कोणत्या बोगीत बसला ते शोधले अन् पहाटे ३.३० वाजता त्याला आरपीएफच्या पथकाने अकोल्याजवळ धावत्या ट्रेनमध्ये जेरबंद केले. त्याला नंतर अकोला स्थानकावर उतरवून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. हे कळताच अतिरिक्त अधीक्षक राहुल माकणीकर यांनी लगेच एक पोलीस पथक अकोल्याकडे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रवाना केले.

Web Title: The drilling machine guy went and the umred massacre unfolded, two accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.