अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जाहीर होणार

By आनंद डेकाटे | Published: January 21, 2024 06:44 PM2024-01-21T18:44:30+5:302024-01-21T18:45:44+5:30

येत्या मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

The final voter list will be announced tomorrow | अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जाहीर होणार

अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला जाहीर होणार

नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशी राजकीय पक्षाची सभा व पत्रकार परिषद घेऊन मतदार यादी संदर्भात माहिती देण्यात येणार असल्याचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा सुधारित संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्याचा २२ जानेवारी असा होता. तथापि महाराष्ट्र शासनाच्या १९ जानेवारीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी रोजी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या १९ जानेवारीच्या पत्रानव्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येत्या मंगळवारी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
 
नागपूर जिल्हास्तरावरील विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी विषयक तसेच निवडणूक विषयक जनजागृती करण्याकरिता सिव्हील लाईन येथील डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात ‘फरक पडतो’ या पथनाट्य स्पर्धेचे आयोजन २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Web Title: The final voter list will be announced tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर