पहिल्याच वादळी पावसाचा फटका; हजारो नागपूरकरांची रात्र अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 11:14 AM2022-05-26T11:14:00+5:302022-05-26T11:28:17+5:30

मंगळवारी वादळी पावसामुळे शहरातील झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या तुटल्या. पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची बुधवारी दिवसभर चांगलीच दमछाक झाली.

The first hurricane; The night of thousands of Nagpurkars in darkness | पहिल्याच वादळी पावसाचा फटका; हजारो नागपूरकरांची रात्र अंधारात

पहिल्याच वादळी पावसाचा फटका; हजारो नागपूरकरांची रात्र अंधारात

Next
ठळक मुद्देमदतीसाठी ७५ कॉल, २४ तासानंतरही यंत्रणा राबतेय

नागपूर : २४ तासांपूर्वी आलेल्या पहिल्याच वादळी पावसाचा नागपूरकरांना जोरदात तडाखा बसला. अवघ्या तासभराच्या वादळी पावसात १४१ झाडे पडली, विजेचे पडले, तारा तुटल्या. यामुळे २ हजारांवर घरांमध्ये अंधार पसरला. बुधवारी हीच स्थिती कायम असल्याने नागरिकांना उकाड्यात दिवस काढावा लागला. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मनपा आणि वीज वितरण कंपनीच्या यंत्रणेची दिवसभर धावाधाव सुरू होती.

मंगळवारी वादळी पावसामुळे शहरातील झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या तुटल्या. पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची बुधवारी दिवसभर चांगलीच दमछाक झाली. अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी ७० कॉल आले. अपुऱ्या मनुष्यबळातही अग्निशमन व उद्यान विभागाच्या चमूंनी पडलेली झाडे हटविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले.

सर्वाधिक नुकसान पश्चिम व उत्तर नागपुरात

पश्चिम व उत्तर नागपुरात वादळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. सिव्हिल लाइन्स, सदर, गिट्टीखदान, काटोल रोड, जरीपटका, गोरेवाडा आदी भागातील झाडांना सर्वाधिक नुकसान झाले.

झाडे हटविण्याचे काम बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. के. टी. नगर उद्यान, राम कुलरजवळ, गिट्टी खदान चौक, बिनाकी मंगळवारी, शिवाजी पुतळा, दटके हॉस्पिटल मागे, शांतीनगर कॉलनी, आय.बी.एम. रोड मोठी मस्जिदजवळ, सी.आय.डी. ऑफिसजवळ, गिट्टीखदान पोलीस स्टेशन जवळ, जैवविविधता कार्यालय रोड, रामगिरी बंगला रोड वॉकर स्ट्रीट, रवीनगर क्वार्टर परिसर व रोड, पोलीस लाइन टाकळी, रमाईनगर उद्यान, लघुवेतन कॉलनी, जरीपटका जनता चौक, जागृती कॉलनी उद्यान, टी.व्ही. टॉवर चौक, उत्कृर्ष नगर नासुप्र उद्यानाजवळ, जेल रोड रहाटे कॉलनी चौक, टेकानाका, इंदोरा आदी भागांमध्ये पडलेली झाडे हटविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

तक्रारींचे निराकरण होणार - आयुक्त

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांच्या समस्या व तक्रार निवारणासाठी विभाग २४ तास सेवेत आहे. तक्रार मिळताच संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी पोहचून मदत करीत असल्याची माहिती आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिली.

मदतीसाठी येथे संपर्क साधा

आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. नागरिकांनी ०७१२ २५६७०२९, २५६७७७७, २५४०२९९, २५४०१८८ या क्रमांकांवर किंवा १०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

वरिष्ठ अधिकारीही फिल्डवर

वादळी पावसामुळे वीज वितरण यंत्रणेचेही मोठे नुकसान झाले. पश्चिम नागपूरला सर्वाधिक फटका बसला. २ हजार घरात रात्रभर अंधार होता. काही भागात तर बुधवारी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. महावितरण अभियंता व कर्मचारी रात्री टॉर्चच्या प्रकाशात मदत कार्यात व्यस्त होते. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी प्रभावित भागांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेतला. अधिक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत टेंभेकर, नितीन उज्जैनकर आदी उपस्थित होते.

४० खांब पडले, तारा तुटल्या

मंगळवारी महापारेषणचे सबस्टेशन ठप्प पडल्याने शहरात वीज संकटाला सुरुवात झाली. त्यात पावसाची भर पडली. महावितरणच्या प्राथमिक अंदाजानुसार यामुळे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. वीज तारा व ४० खांब पडले. काही ठिकाणी झाडे तारावर. पडली. बुधवारी सायंकाळपर्यंत ९० टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.

Web Title: The first hurricane; The night of thousands of Nagpurkars in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.