पहिला पती झाला सैतान; दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, महिलेला जीवे मारण्याची धमकी

By योगेश पांडे | Published: July 7, 2023 05:08 PM2023-07-07T17:08:07+5:302023-07-07T17:10:15+5:30

१२ वर्षांनंतर भेट झाल्यावर टिफीन देणे पडले महागात

The first husband became Satan; Assault on second husband, threat to kill woman | पहिला पती झाला सैतान; दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, महिलेला जीवे मारण्याची धमकी

पहिला पती झाला सैतान; दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, महिलेला जीवे मारण्याची धमकी

googlenewsNext

नागपूर : १२ वर्षांनंतर अचानक भेट झालेल्या पहिल्या पतीवर दया दाखवत त्याला जेवणाचा टिफीन पोहोचविण्यासाठी होकार देणे एका दांपत्याला चांगलेच महागात पडले. पतीने चांगल्यापणाचा फायदा घेत महिलेचा जीव घेण्याची धमकी देत दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

राजेश दयाचंद अहिरवार (४०) असे आरोपीचे नाव आहे. राजेशच्या जाचाला कंटाळून त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला सोडले होते. २०११ साली तिचे लग्न संजू (जरीपटका) याच्याशी झाले. त्यांना मुलदेखील झाले व दोघेही मजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते. काही दिवसांअगोदर घराच्या परिसरात त्यांना राजेश भेटला. एकटाच राहत असल्याने पाचशे रुपये महिन्यावर जेवणाचा टिफिन पुरवाल का अशी विनंती त्याने दांपत्याला केली. दोघांनीही त्याला होकार दिला व त्याला नियमित टिफिन पोहोचविला जात होता.

६ जुलै रोजी रात्री अडीच वाजेनंतर राजेश फायबरच्या दरवाजाला लाथ मारून संजूच्या झोपडीत शिरला. त्याचा हातात चाकू होता व आज मला सोडून गेलेल्या पत्नीचा खूनच करतो असे म्हणून तो अंधारात तिला शोधायला लागला. संजूने प्रसंगावधान राखत राजेशला लाथ मारून खाली पाडले. संतापलेल्या राजेशने संजूच्या पायाच्या पोटऱ्यांवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर तो चाकू टाकून पळून गेला. या हल्ल्याने दांपत्य हादरले असताना तो परत आला व संजूच्या बायकोचा खून करेल, अशी धमकी देत फरार झाला. परिचयातील लोक संजूला मेयो इस्पितळात घेऊन गेले व तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात राजेशविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांकडून फरार राजेशचा शोध सुरू आहे.

Web Title: The first husband became Satan; Assault on second husband, threat to kill woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.