कलात्मक बॉक्समध्ये सुकामेवा भेट देण्याची वाढली चलन; दिवाळीत होते २० कोटींची उलाढाल

By मोरेश्वर मानापुरे | Published: November 7, 2023 08:44 PM2023-11-07T20:44:34+5:302023-11-07T20:44:41+5:30

सुकामेव्याच्या आकर्षक भेटवस्तूंचे बॉक्सेस बाजारात

The growing trend of gifting dried fruit in artistic boxes; 20 crore turnover in Diwali | कलात्मक बॉक्समध्ये सुकामेवा भेट देण्याची वाढली चलन; दिवाळीत होते २० कोटींची उलाढाल

कलात्मक बॉक्समध्ये सुकामेवा भेट देण्याची वाढली चलन; दिवाळीत होते २० कोटींची उलाढाल

नागपूर : बाजाराचे व्यवहार हायटेक होत असतानाच भेटवस्तू देण्याची पद्धतही हायटेक झाली आहे. काही वर्षांआधी भेटस्वरुपात देण्यात येणाऱ्या मिठाईचा जागा आता सुकामेव्याने घेतली आहे. दिवाळीत नागपुरात सुकामेवा बॉक्सेस विक्रीचा २० हून अधिक कोटींचा व्यवसाय होत असल्याची माहिती आहे. हा व्यवसाय दरवर्षी वाढतच आहे.

मध्य भारतात सुकामेवा विक्रीचे प्रतिष्ठान महावीर मेवावाला, मंत्री ड्रायफ्रूट मार्ट आणि अन्य विक्रेत्यांनी आकर्षक आकार आणि डिझाईनच्या अनेक प्रकारचे सुकामेव्याचे बॉक्सेस बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. सर्वच बॉक्सेस नजरेत भरणारे आहे. प्रत्येकजण खरेदीसाठी उत्सुक आहे. बॉक्सेसची रेंज पाहता सामान्यही खरेदी करून कुणालाही भेट देऊ शकतो.

सात ते आठ वर्षांपासून वाढली फॅशन
महावीर मेवावालाचे संचालक अरुण कोटेचा व अतुल कोटेचा म्हणाले, दिवाळी आनंदाचा पर्व असून एकत्रितरीत्या साजरा केला जातो. हायटेक होणाऱ्या या उत्साहात भेटवस्तू देण्याची पद्धतही हायटेक झाली आहे. आधीच्या मिठाईच्या तुलनेत आता सुकामेव्याचे बॉक्सेस देऊन शुभेच्छा देतात. सात ते आठ वर्षांपासून भेटस्वरुपात सुकामेवा देण्याची पद्धत वाढली आहे. दुध आणि खोव्यापासून तयार होणारी मिठाई जास्त दिवस टिकत नाही, हे याचे मुख्य कारण आहे.

दृढ होतात संबंध
नागपुरात पॅकिंगचे ४० प्रकारचे कलात्मक बॉक्सेस पुणे, जोतपूर आणि बेंगळुरू येथून येतात. यामध्ये नारळ, गिटार, गणेश, ओम, दीपक, राउंड बॉक्स, चटई आकाराचे बॉक्सेस ग्राहकांना अधिक पसंत येतात. या भेटवस्तूमुळे एकमेकांचे संबंध अधिक दृढ होतात. शहरात सर्वप्रथम महावीर मेवावालाने हाताने तयार केलेल्या अशा प्रकारच्या आकर्षक कलात्मक गिफ्ट बॉक्सेसची सुरुवात केली. गेल्यावर्षी बैलगाडी, घड्याळ, बॅटचा गिफ्ट बॉक्स आकर्षणाचे केंद्र होते. महावीर मेवावालामध्ये तीन पिढ्यांपासून बॉक्स आकर्षक दिसण्यावर भर दिला जातो. विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ येथील ग्राहक खरेदीसाठी नागपुरात येतात.

गिफ्ट बॉक्समध्ये काजू, किसमिस, बादाम, पिस्ता, अंजीर, जर्दाळू आणि अन्य सुकामेवा पॅक करून किफायत दरात उपलब्ध करून देण्यात येतो. बॉक्सची रेंज २९० रुपये ते ६ हजार रुपयांपर्यंत आहे. किफायत किमतीत आकर्षक गिफ्ट बॉक्स आणि त्यात उत्तम दर्जाचा सुकामेवा उपलब्ध करून देण्यात येतो.

नातेवाईक, कॉर्पोरेट क्षेत्रासह अनेक कार्यालयांमध्ये भेटस्वरुपात आकर्षक गिफ्ट पॅकमध्ये सुकामेवा देण्याची चलन वाढली आहे. बॉक्स किफायत दरात असल्याने सामान्यांनाही परवडतात. यामुळे संबंध दृढ होतात - अतुल कोटेचा, संचालक, महावीर मेवावाला.

दिवाळीत दुध व खोव्यापासून तयार केलेली मिठाई काही दिवसात खराब होत असल्याने सुकामेव्याचे गिफ्ट पॅक देण्याची चलन वाढली आहे. सुकामेवा काही महिने टिकतो. लग्नसमारंभातही भेट देण्याची चलन वाढली आहे. - गोविंद मंत्री, संचालक, मंत्री ड्रायफ्रूट मार्ट. ()

Web Title: The growing trend of gifting dried fruit in artistic boxes; 20 crore turnover in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.