संशयाचे भूत डोक्यात! ‘लव्ह स्टोरी’चा अंत, पत्नीचा गळा चिरून पती पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 11:22 AM2023-08-28T11:22:17+5:302023-08-28T11:26:33+5:30

नेहमीच संशय घेत असल्याने उडायचे खटके

The husband who cut his wife's throat and absconded after locking the house, was caught by the police | संशयाचे भूत डोक्यात! ‘लव्ह स्टोरी’चा अंत, पत्नीचा गळा चिरून पती पसार

संशयाचे भूत डोक्यात! ‘लव्ह स्टोरी’चा अंत, पत्नीचा गळा चिरून पती पसार

googlenewsNext

नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही थरारक घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकरनगरात रविवारी सकाळी उघडकीस आली. वाडी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

प्रणाली ललित दहाट (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. तर ललित रामदास दहाट (वय ३८) दोघे. रा. आंबेडकरनगर वाडी असे अटक झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. सहा वर्षांपूर्वी दोघांनी मंदिरात लग्न केले. लग्नानंतर ललित हा प्रणालीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरून दोघांमध्ये सतत खटके उडायचे. प्रणाली शुक्रवारी २५ ऑगस्टला माहेरी वर्धा येथे गेली होती. रविवारी सकाळी आठ वाजता ती वर्धेवरून नागपुरात आली. ती रहाटे कॉलनी चौकात उतरल्यानंतर आरोपी ललित तिला घेण्यासाठी गेला. दोघेही सकाळी साडेआठ वाजता घरी परतले.

घरी येताच पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. आरोपी ललितने संतप्त होऊन धारदार शस्त्राने गळा चिरून प्रणालीची हत्या केली. त्यानंतर घराला कुलूप लावून तो फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावार हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पंचनामा करून प्रणालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पती ललितला अटक केली आहे.

नेहमीच व्हायचे टोकाचे वाद

  • आरोपी ललित हा एका बारमध्ये सुरक्षा रक्षक आहे. तर प्रणाली ही मूळची वर्धा येथील रहिवासी असून ती वाडीत एका कापड दुकानात सेल्स गर्ल म्हणून काम करीत होती. ललित आणि प्रणाली यांचे हे दुसरे लग्न आहे. दोघांनीही आपल्या पती आणि पत्नीला सोडून दिले आहे.
  • दोघांनाही पहिल्या पती आणि पत्नीपासून दोन-दोन मुले आहेत. कामानिमित्त सहा वर्षांपूर्वी वाडीत आलेली प्रणाली आंबेडकरनगरात किरायाच्या घरात राहत होती. दरम्यान, दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांचे सूत जुळले. प्रणालीच्या प्रेमात पडल्यामुळे आरोपी ललित आपल्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला. दोघांनीही मंदिरात जाऊन लग्न केले.
  • मागील सहा वर्षांपासून ते सोबत राहत होते. परंतु आरोपी ललित नेहमीच प्रणालीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे नेहमीच त्यांच्यात वाद होत होता. रविवारी प्रणाली वर्धावरून परतल्यानंतर त्यांच्यात टोकाचा वाद झाला. या वादातून आरोपी ललितने प्रणालीचा धारदार शस्त्राने गळा चिरून तिची हत्या केली अन् त्यांच्या प्रेम कहाणीचा असा करुण अंत झाला.

Web Title: The husband who cut his wife's throat and absconded after locking the house, was caught by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.