भारत मुक्ती मोर्चाच्या नेते ताब्यात, संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा दिला होता इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 12:38 PM2022-10-06T12:38:58+5:302022-10-06T12:46:05+5:30

परवानगी नाकारलीबतरी मोर्चा काढू असा इशाराही बामसेफने दिला होता.

The leader of Bharat Mukti Morcha was detained and warned to march on the headquarters of the party | भारत मुक्ती मोर्चाच्या नेते ताब्यात, संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा दिला होता इशारा

भारत मुक्ती मोर्चाच्या नेते ताब्यात, संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा दिला होता इशारा

Next

आनंद डेकाटे

नागपूर - बामसेफ प्रणित भारत मुक्ती मोर्चा तर्फे आज ६ ऑक्टोबर रोजी आरएसएस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. परवानगी नाकारलीबतरी मोर्चा काढू असा इशाराही बामसेफने दिला होता. त्यानुसार आज पोलिसांनी सकाळपासून भारत मुक्ती मोर्च्या च्या नेत्यांना डिटेन करणे सुरू केले. अनेक राज्यस्तरीय नेत्यांना डिटेन करण्यात आल्याचे सांगितले जाते. 

बामसेफने नेते वामन मेश्राम यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना सध्या इंदोरा येथील पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ज्या बेझनबाग मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती त्या परिसराला पोलिसांनी वेढा घातला आहे.

Web Title: The leader of Bharat Mukti Morcha was detained and warned to march on the headquarters of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर