राज्यातील मोठ्या शहरातील बसस्थानकांना देणार एअरपोर्टचा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 07:09 PM2023-04-15T19:09:15+5:302023-04-15T19:14:37+5:30

Nagpur News राज्यातील सर्व मोठ्या शहरातील बसस्थानके (बसपोर्ट) एअरपोर्टसारखी चकचकीत केली जाणार आहेत. त्याची सुरुवात नागपुरातील बसस्थानकापासून होईल, असा संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केला.

The look of the airport will be given to the bus stands in the big cities of the state | राज्यातील मोठ्या शहरातील बसस्थानकांना देणार एअरपोर्टचा लूक

राज्यातील मोठ्या शहरातील बसस्थानकांना देणार एअरपोर्टचा लूक

googlenewsNext

नरेश डोंगरे 

नागपूर : राज्यातील सर्व मोठ्या शहरातील बसस्थानके (बसपोर्ट) एअरपोर्टसारखी चकचकीत केली जाणार आहेत. त्याची सुरुवात नागपुरातील बसस्थानकापासून होईल, असा संकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका कार्यक्रमात मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला मान्यता दिली.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) तर्फे विदर्भातील सहा उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नागपुरातील अजनी रेल्वे पुलासह सहा पुलांच्या कामांचे भूमिपूजन फडणवीस-गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. गडकरी यांना उद्देशून ते म्हणाले, दिल्लीच्या धर्तीवर आयएसबीटीसारखा प्रकल्प उभारायचा आहे. राज्यातील मोठ्या शहरातील बसस्थानके बसपोर्टमध्ये परावर्तीत करायची आहे. आमची योजना तयार आहे. त्यासाठी केंद्राने निधी द्यावा, राज्य सरकार जागा देईल. त्यातून एअरपोर्टसारखे बसस्थानकं तयार करू.

फडणवीस यांच्या या मागणीचे मुख्यमंत्री शिंदे यांनी समर्थन केले. या कार्यक्रमाला ते ऑनलाइन उपस्थित होते. शिंदे यांनी या योजनेची सुरुवात नागपूरच्या बसस्थानकापासून करण्यासही आपली मंजुरी असल्याचे म्हटले. त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनीदेखील या योजनेचे काैतुक करून आपण केंद्रातून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे म्हटले.

चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा

बसपोर्टवर प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येईल. बसपोर्टची कल्पना प्रत्यक्षात आल्यास बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होईल. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही चांगली भर पडेल, अशी अपेक्षा आहे.

----

Web Title: The look of the airport will be given to the bus stands in the big cities of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.