नागपूर शहरातील मुख्य रस्त्यांचा होणार मेकओव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 08:46 PM2023-02-15T20:46:14+5:302023-02-15T20:46:40+5:30

Nagpur News नागपूरचे वैशिष्टये असणारी संत्री तसेच येथील विविध प्रसिद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित व्हावा, तसेच सजावटी व पायाभूत सुविधांच्या संदर्भातील कामे गतीने पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

The main roads of Nagpur city will get a makeover | नागपूर शहरातील मुख्य रस्त्यांचा होणार मेकओव्हर

नागपूर शहरातील मुख्य रस्त्यांचा होणार मेकओव्हर

googlenewsNext
ठळक मुद्देजी-२० आयोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नागपूर : जी-२० परिषद आयोजनाच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विमानतळ ते प्राईड हॉटेल आणि पुढे रॅडिसन ब्लू हॉटेल, मिहान, पेंच, फुटाळा तलाव आदी मार्गांवर सौंदर्यीकरण व रस्ते विकासाचे काम सुरु आहे. या मार्गावर नियोजित सौंदर्यीकरण व विकास कामे करताना नागपूरचे वैशिष्टये असणारी संत्री तसेच येथील विविध प्रसिद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित व्हावा, तसेच सजावटी व पायाभूत सुविधांच्या संदर्भातील कामे गतीने पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

जी-२० परिषदेच्या आयोजनाबाबत बुधवारी डॉ. बिदरी यांच्या अध्यक्षतेत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सहायक पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या संस्थांनी शहरातील नियोजित रस्ते व स्थळांच्या सौंदर्यीकरणाबाबत व विकासाबाबत सादरीकरण केले. त्यात त्यांनी उपरोक्त सूचना केल्या.

नागरी संस्थांच्या प्रतिनिधींना सूचना देण्याचे आवाहन

नागपूरात २१ आणि २२ मार्च रोजी जी-२० परिषद होणार आहे. यात २७ देशांतील ६० प्रतिनिधींसह भारतातील जवळपास १४० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिव्हील सोसायटी अर्थात सी-२० ही या परिषदेची मध्यवर्ती कल्पना आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत नागरी संस्थांसाठी ही संधी आहे. या संधीचा उपयोग करून स्थानिक नागरी संस्थानी वेगवेगळे जनजागृतीपर आयोजन करावे. तसेच जागतिक स्तरावर उपयुक्त ठरतील अशा सूचना व मते या संस्थानी द्याव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले. या संस्थानी सूचना व मते उपायुक्त (करमणूक) चंद्रभान पराते यांच्या कार्यालयात पोहोचवावे. प्राप्त सूचना व मते जी २० सचिवालयास पाठविण्यात येतील असेही डॉ. बिदरी यांनी सांगितले.

Web Title: The main roads of Nagpur city will get a makeover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.