Nagpur: पारा घसरला, वातावरणात गारठा पसरला; दिवस, रात्रीचे तापमान घटले, पावसाची शक्यता कायम
By निशांत वानखेडे | Published: January 22, 2024 07:02 PM2024-01-22T19:02:53+5:302024-01-22T19:10:40+5:30
Nagpur News: ढगाळ वातावरणासह वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे दिवसरात्रीच्या तापमानात घसरण झाली असून गारठा वाढायला लागला आहे. यामध्ये पावसाची शक्यता कायम असून पुढचे दाेन दिवस नागपूरसह विदर्भात किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज आहे.
- निशांत वानखेडे
नागपूर - ढगाळ वातावरणासह वेगवेगळ्या दिशेने वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे दिवसरात्रीच्या तापमानात घसरण झाली असून गारठा वाढायला लागला आहे. यामध्ये पावसाची शक्यता कायम असून पुढचे दाेन दिवस नागपूरसह विदर्भात किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज आहे.
साेमवारपासून २४ तारखेपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार साेमवारी सकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते. त्यामुळे गार वारा अंगाला झाेंबत हाेता. दिवसा नागपुरात २७.४ अंश कमाल तापमानाची नाेंद झाली, जे सरासरीपेक्षा १.९ अंशाने कमी आहे. दुसरीकडे वातावरणातील आर्द्रतेमुळे रात्रीचे तापमानही २४ तासात २.४ अंशाने घसरत १४.४ अंशावर पाेहचले. हे तातापमान सरासरीपेक्षा अद्यापही वर असले तरी बदलते हवामान पाहता त्यात आणखी घसरण हाेण्याची आणि गारठा वाढण्याची शक्यता आहे.