आमदार-खासदार घडविणार भक्तांना श्रीरामाचे दर्शन

By योगेश पांडे | Published: January 5, 2024 01:22 PM2024-01-05T13:22:44+5:302024-01-05T13:23:03+5:30

नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षश्रेष्ठींनी याबाबत आमदारांना माहिती दिली.

The MLA-MP will arrange the darshan of Shri Rama for the devotees | आमदार-खासदार घडविणार भक्तांना श्रीरामाचे दर्शन

आमदार-खासदार घडविणार भक्तांना श्रीरामाचे दर्शन

नागपूर : अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी भाजपकडून वातावरणनिर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोहळ्यानंतर प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून किमान ५ हजार नागरिकांना अयोध्या मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नागपुरात हिवाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षश्रेष्ठींनी याबाबत आमदारांना माहिती दिली. त्याअंतर्गत मतदारसंघातील ५ हजार नागरिकांना टप्प्याटप्प्याने अयोध्येत नेण्यात येईल. तेथे पक्षाकडून निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात नेणे इत्यादी बाबींची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अख्खी रेल्वेगाडीच आरक्षित करणार
विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाखो नागरिकांना अयोध्येला नेणार आहे. एकाच मार्गावरील मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेगाड्याच बुक करण्यात येणार आहेत. त्यास ‘रामलला दर्शन विशेष ट्रेन’ असेच नाव देणार आहे.

२० हजार लोकांची जबाबदारी यांच्यावर 
आमदारांसोबतच भाजपने राज्यातील सर्व खासदारांनादेखील विशिष्ट लक्ष्य दिले आहे. त्यांना २० हजार नागरिकांना दर्शन करावयाचे आहे. यासोबतच जेथे भाजपचे आमदार, खासदार नाहीत तेथे लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक प्रमुख अथवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे.
 

Web Title: The MLA-MP will arrange the darshan of Shri Rama for the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.