असंही नियोजन... चार फुटांवरील मूर्तींसाठी मनपा करणार मंडळांचा सर्व्हे

By गणेश हुड | Published: August 31, 2022 08:20 PM2022-08-31T20:20:04+5:302022-08-31T20:21:01+5:30

विसर्जनासाठी नियोजन : ३७० विसर्जन टँक, हजाराहून अधिक कर्मचारी

The Nagpur municipality will conduct a survey of circles for idols above four feet | असंही नियोजन... चार फुटांवरील मूर्तींसाठी मनपा करणार मंडळांचा सर्व्हे

असंही नियोजन... चार फुटांवरील मूर्तींसाठी मनपा करणार मंडळांचा सर्व्हे

Next

नागपूर : चार फुटांवरील मूर्ती विसर्जनाला शहरातील तलावात बंदी घालण्यात आली आहे. या मूर्तींचे शहराबाहेर विसर्जन करण्यात येणार असल्याने किती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अशा मूर्तींची स्थापना केली. यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गुरुवारपासून गणेशोत्सव मंडळांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

चार फुटांवरील मूर्तींचे विसर्जन कन्हान नदी, कोलार नदीत करण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी मनपाव्दारे क्रेन व विजेची व्यवस्था केली जाणार आहे. गर्दी होऊ नये यासाठी मंडळांना विसर्जनासाठी वेगवेगळी वेळ दिली जाणार आहे. यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापक विभागाचे उपायुक्त व संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

विसर्जनासाठी ३७० टँक
यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत मूर्तींची संख्या अधिक राहणार आहे. याचा विचार करता शहरातील विविध भागात, चौकात विसर्जनासाठी ३७० कृत्रिम टँकची व्यवस्था राहणार आहे. प्रत्येक टँकवर मनपाचे तीन कर्मचारी, असे हजाराहून अधिक कर्मचारी तैनात राहतील.

विसर्जनासाठी १४ मोबाइल व्हॅन
भाविकांना विसर्जनाची सुविधा व्हावी, यासाठी १४ मोबाइल व्हॅन राहणार आहेत. मोबाइलवर कॉल करताच ही व्हॅन संबंधितांच्या घरी येईल. प्रत्येक झोनमध्ये एक तर काही झोनमध्ये दोन मोबाइल व्हॅनची व्यवस्था केली जाणार आहे.

निर्माल्यापासून खत निर्मिती
गणेशोत्सवात सुमारे तीनशे मेट्रिक टन निर्माल्य संकलित होण्याची शक्यता आहे. निर्माल्य नेहमीच्या कचऱ्यात न टाकता, भांडेवाडी येथील कंपोस्टिंग प्लंटमध्ये त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचा वापर सार्वजनिक उद्यानात केला जाणार असल्याची माहिती गजेंद्र महल्ले यांनी दिली.

बॅगमध्ये करणार निर्माल्य संकलित
एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांनी निर्माल्य रथाद्वारे निर्माल्य संकलनाची जबाबदारी स्वीकारली आहे. झोन स्तरावरील दहा रथात प्रत्येकी दहा निर्माल्य संकलन बॅग ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपल्या घरगुती गणपतीचे संकलित केलेले निर्माल्य, आपल्या परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळात आणून द्यावे, सर्व संकलित केलेले निर्माल्य मनपाचे निर्माल्य रथ दररोज संकलित करणार असल्याची माहिती डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

Web Title: The Nagpur municipality will conduct a survey of circles for idols above four feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.