शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खू संघाची गरज; राज्यस्तरीय अधिवेशनात भिक्खूसंघाचा सूर
By आनंद डेकाटे | Published: May 13, 2023 06:54 PM2023-05-13T18:54:27+5:302023-05-13T18:54:53+5:30
Nagpur News भिक्खुसंघच मजबूत करण्यासोबतच शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खु संघाची गरज आहे, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित अखिल भारतीय भिक्खुसंघाच्या राज्यरास्तरीय अधिवेशनात निघाला.
आनंद डेकाटे
नागपूर : भिक्खु संघाच्या माध्यमातून बौद्ध धम्म पुन्हा प्रज्वलीत होत आहे. मात्र अनेक भिक्खुंवर समाजातून आरोप होतात. त्यामुळे सर्वप्रथम भिक्खुसंघच मजबूत करण्यासोबतच शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खु संघाची गरज आहे, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित अखिल भारतीय भिक्खुसंघाच्या राज्यरास्तरीय अधिवेशनात निघाला.
ऑल इंडिया भिक्खु संघांतर्गत महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघ राज्य अधिवेशन दीक्षाभूमी येथील आडोटोरीयमध्ये आयोजित करण्यात आले. बौद्ध प्रशिक्षण संस्थानचे अध्यक्ष भदंत सत्यशील महास्थविर अध्यक्ष यांचे हस्ते या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. भिक्खू संघाचे प्रदेश अध्यक्ष भदंत धम्मसेवक महास्थविर हे अध्यक्षस्थानी होते.
या अधिवेशनात दोन दिवस भिक्खुसंघा सबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यात संघ मजबूत करणे, विनयधर व वरिष्ठ भिक्खूंचा सन्मान राखणे, विनयाविरूद्ध किवा संघाविरूद्ध धम्माविरूद्ध वर्तन करणाऱ्यांविरूद्ध कारवाही करणे, शिस्तबद्ध अनुशासनबद्ध भिक्खू संघ निर्माण करुन वेळोवेळी प्रशिक्षण देणे, प्रत्येक जिल्हास्तरिय भिक्खूसंघाची शाखा स्थापित करणे,आदींवर यात चर्चा केली जाईल.