संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन लोकसभा अध्यक्षांनीच करावं; तरच कार्यक्रमाला जाणार 

By आनंद डेकाटे | Published: May 27, 2023 06:42 PM2023-05-27T18:42:33+5:302023-05-27T18:42:59+5:30

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करायला हवे. तसे झाल्यास आम्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमातही सहभागी होऊ, अशी माहिती ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी येथे दिली.

The new Parliament building should be inaugurated by the Lok Sabha Speaker; Only then will go to the program | संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन लोकसभा अध्यक्षांनीच करावं; तरच कार्यक्रमाला जाणार 

संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन लोकसभा अध्यक्षांनीच करावं; तरच कार्यक्रमाला जाणार 

googlenewsNext

आनंद डेकाटे 

 नागपूर : लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेचे संरक्षक आहेत. लोकसभेत अध्यक्ष हे सर्वोच्च पद आहे. पंतप्रधान हे संसदेतील कार्यकारी आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करायला हवे. तसे झाल्यास आम्ही उद्घाटनाच्या कार्यक्रमातही सहभागी होऊ, अशी माहिती ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी येथे दिली.


शनिवारी ते नागपुरात पक्षाच्या जाहीर कार्यक्रमासाठी आले असता नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. लोकसभा अध्यक्षांनी उद्घाटन केल्यास आकाश कोसळणार नाही. पंतप्रधानांनी आपले मन मोठं करावं, देशात लोकतंत्र आहे, असेही ते म्हणाले.


लोकसभेत नियमबाह्य ३७० कलम हटवण्याचा आम्ही विरोध केला होता. तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्याला समर्थन दिले. आज दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही केंद्र सरकारने त्या विरोधात वटहुकूम आणला. या मुद्यावर केजरीवाल रडत बसले आहे. आता या मुद्यावर त्यांना सर्वोच्च न्यायालयात भांडत रहावे लागणार आहे. भारतीय संविधानानुसार विशिष्ट वयानुसार प्रत्येकाला लग्नाचा अधिकार आहे. कोणी कोणाशी लग्न करावे, हे कोण ठरवणार व रोखणार आहे? महाराष्ट्रात लव जिहादच्या नावावर भाजपा आणि संघाने आंदोलन केले. त्यातून द्वेष पसरवण्याचे काम केले. भाजपाचे लोक रोजगार, शेतकरी आत्महत्यांवर बोलत नाहीत. लव जिहादच्या नावावर मुस्लीम समुदायाविरोधात द्वेष पसरवण्याचा काम केले जात आहे, असेही ओवेसी म्हणाले.

Web Title: The new Parliament building should be inaugurated by the Lok Sabha Speaker; Only then will go to the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.