अधिकाऱ्यांनी हत्तीरोगाच्या स्वत:च घेतल्या गोळ्या, नागरिकांच्या मनातील संभ्रम केला दूर

By सुमेध वाघमार | Published: August 17, 2023 06:21 PM2023-08-17T18:21:38+5:302023-08-17T18:22:05+5:30

हत्तीरोग विभागातर्फे १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग दुरीकरण मोहीम

The officials took elephant disease pills themselves, removed the confusion in the minds of the citizens | अधिकाऱ्यांनी हत्तीरोगाच्या स्वत:च घेतल्या गोळ्या, नागरिकांच्या मनातील संभ्रम केला दूर

अधिकाऱ्यांनी हत्तीरोगाच्या स्वत:च घेतल्या गोळ्या, नागरिकांच्या मनातील संभ्रम केला दूर

googlenewsNext

 नागपूर : नागरिकांचे मनोबल वाढविण्यासह त्यांच्या मनात कुठलाही संभ्रम राहू नये याकारीता मनपाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: गोळ्या घेत हत्तीरोग दुरीकरण मोहीमेचा अनोखा शुभारंभ केला. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 

मनपाच्या नेहरूनगर झोन कार्यालय येथून हत्तीरोग समूळ दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, डॉ. विजय तिवारी, माजी नगरसेविका दिव्या धुरडे, स्नेहल बिहारे यांच्यासह झोनल वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी स्वत: गोळ्या घेत मोहिमेविषयी जनजागृती केली. हत्तीरोग संदर्भात जनजागृती करण्याकरिता मनपाच्या लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन या झोनमध्ये जवळपास ६२४ जनजागृती बूथ उभारण्यात आले आहेत. तसेच ५६७ चमूच्या माध्यमातून घरोघरी गोळ्या वितरित करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करीत मोहिम यशस्वी करावी असे आवाहन हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे करण्यात आले आहे.

Web Title: The officials took elephant disease pills themselves, removed the confusion in the minds of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.