भाडेकरू वृद्ध झाला सैतान, नातीच्या वयाच्या चिमुकलीवर अत्याचार
By योगेश पांडे | Published: July 13, 2023 05:56 PM2023-07-13T17:56:07+5:302023-07-13T17:58:09+5:30
परिसरात संतापाचे वातावरण
नागपूर : वासनेपोटी एक वृद्ध मनुष्य इतका खालच्या स्तराला गेला की त्याच्या नातीच्या वयाच्या चिमुकलीवर त्याने अत्याचार केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
मोहम्मद इद्रीस शेख (६५) असे आरोपीचे नाव असून तो यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो काही काळापासून एका घरी किरायाने राहत होता. घरमालकाशी त्याची चांगली ओळखी होती व त्याचाच गैरफायदा त्याने घेतला. तो नेहमी घरमालकाच्या १० वर्षीय मुलीशी सलगीने वागायचा. ती त्याच्या नातीच्या वयाची असल्याने कुणालाही शंका आली नाही.
११ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता तो मुलीला फिरविण्याच्या बहाण्याने गच्चीवर घेऊन गेला व त्याने तेथे तिच्यावर अत्याचार केला. तो कुकृत्य करत असताना घरातील दुसऱ्या भाडेकरूला तो दिसला. त्याने हटकले असता आरोपी तेथून पळून गेला. भाडेकरूने घरमालकाला हा प्रकार सांगितले. घरमालकाने मुलीला विचारले असता तिने रडत रडत आपल्यासोबत लैंगिक छळ झाल्याचे सांगितले. अखेर तिच्या पालकांनी यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी शेखविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.