Nagpur: फुकटात खर्रा खाण्यासाठी वृद्धेचा आवळला गळा! काम तमाम करतो म्हणत धमकावले, आरोपी अटकेत

By योगेश पांडे | Published: July 30, 2023 04:09 PM2023-07-30T16:09:25+5:302023-07-30T16:11:07+5:30

Nagpur Crime: खर्रा घेतल्यावर पैसे मागितल्यामुळे संतप्त झालेल्या एका आरोपीने चक्क एका ७६ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

The old woman's throat is open to eat for free! He threatened saying that he will complete the work, the accused is under arrest | Nagpur: फुकटात खर्रा खाण्यासाठी वृद्धेचा आवळला गळा! काम तमाम करतो म्हणत धमकावले, आरोपी अटकेत

Nagpur: फुकटात खर्रा खाण्यासाठी वृद्धेचा आवळला गळा! काम तमाम करतो म्हणत धमकावले, आरोपी अटकेत

googlenewsNext

- योगेश पांडे
नागपूर - खर्रा घेतल्यावर पैसे मागितल्यामुळे संतप्त झालेल्या एका आरोपीने चक्क एका ७६ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

इंदोरा चौकातील मॉडेल टाऊन येथील रहिवासी सुशीला पुंडलिक खोब्रागडे (७६) या त्यांच्या घरी खर्रा विकतात. २८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रोहीत राजेश मूल (२१, चॉक्स कॉलनी, इंदोरा) हा त्यांच्या घरी आला व त्याने खोब्रागडे यांना खर्रा मागितला. खोब्रागडे यांनी त्याला खर्रा दिला व त्यानंतर पैसे मागितले. यावर आरोपी संतापला व मला खर्रा दे, नाही तर तुझे काम तमाम करेन, अशी धमकी दिली. त्यानंतर तो निघून गेला. मात्र पैसे मागितल्याचा राग मनात धरून तो रात्री साडेअकरा वाजता खोब्रागडे यांच्या घरी आला व त्यांच्याशी वाद घातला. त्याने यातूनच त्यांच्या घरातील चादरीने खोब्रागडे यांचा गळा आवळून जीव घेण्याचा प्रयत्न केला. घरातील नातेवाईक धावून आल्याने रोहीतने तेथून पळ काढला. खोब्रागडे यांच्या मुलाने त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. सुशीला खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली.

Web Title: The old woman's throat is open to eat for free! He threatened saying that he will complete the work, the accused is under arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.