प्रेमसंबंध तुटले अन प्रियकराने तरुणीचे फोटो व्हायरल केले
By योगेश पांडे | Updated: August 24, 2023 18:15 IST2023-08-24T18:13:33+5:302023-08-24T18:15:11+5:30
नागपूर : प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराने चक्क तिचे फोटो व्हायरल करून बदनामी केली तसेच धमकीचे मॅसेज पाठवत तिचा ...

प्रेमसंबंध तुटले अन प्रियकराने तरुणीचे फोटो व्हायरल केले
नागपूर : प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराने चक्क तिचे फोटो व्हायरल करून बदनामी केली तसेच धमकीचे मॅसेज पाठवत तिचा विनयभंग केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
विजय पृथ्वीराज ठाकरे (२५, कळमना) असे आरोपीचे नाव आहे. एका २२ वर्षीय तरुणीची दोन वर्षांअगोदर त्याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. त्याने तिच्याशी मैत्री केली व त्यांचे प्रेम जुळले. मात्र काही कारणावरून तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. यावरून विजय संतापला व त्याने स्वत:सोबतचे तिचे फोटो व्हायरल केले. तसेच त्याने तिला धमकी देत विनयभंग केला. तरुणीने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.