वीज दरवाढीचा ‘शॉक’! आयोग म्हणतोय २.९ टक्के वाढ, पण वाढ झाली १२ ते ३६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 09:25 PM2023-04-01T21:25:15+5:302023-04-01T21:25:48+5:30

Nagpur News आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी राज्यातील नागरिकांना वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसला.

The 'shock' of electricity price hike! The commission is saying a 2.9 percent increase, but the increase was 12 to 36 percent | वीज दरवाढीचा ‘शॉक’! आयोग म्हणतोय २.९ टक्के वाढ, पण वाढ झाली १२ ते ३६ टक्के

वीज दरवाढीचा ‘शॉक’! आयोग म्हणतोय २.९ टक्के वाढ, पण वाढ झाली १२ ते ३६ टक्के

googlenewsNext

नागपूर : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ एप्रिल रोजी राज्यातील नागरिकांना वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसला. राज्य विद्युत नियामक आयोगाने महावितरणची याचिका मंजूर करीत वीज महाग केली. वर्ष २०२३-२४ मध्ये वीजदरात २.९ टक्के व वर्ष २०२४-२५ मध्ये ५.६ टक्के वीज दरवाढ झाल्याचा महावितरणचा दावा आहे, परंतु ही दरवाढ यापेक्षा कितीतरी अधिक पटीने झाल्याची वस्तुस्थिती आहे.

आता विजेचे दर बहुवार्षिक पद्धतीने निश्चित केले जाते, आयोगाने १५ वर्षांसाठी २०२० साली वीजदर निश्चित केले होते. अडीच वर्षांपर्यंत यात कुठलेही संशोधन करता येऊ शकत नाही. आता ही मुदत संपताच महावितरणने दरवाढ याचिका दाखल केली होती. महावितरणने याचिकेत ६७,६४३ कोटी रुपयाच्या महसूल भरपाई वीजबिलामार्फत करण्याची विनंती केली होती, परंतु आयोगाने ३९,५६७ कोटी रुपयेच मंजूर केले. मात्र, महावितरणच्या विनंतीनुसार इंधन समायोजन शुल्क मागच्या वर्षाच्या दरात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जितकी दरवाढ झाली, तितकी ती कागदावर दिसून येत नाही आहे. उन्हाळ्यात लोडशेडिंग थांबविण्यासाठी खरेदी करण्यात आलेली महागडी वीज, कोळसा आदींवरील खर्च या शुल्काच्या माध्यमातून वसुल केले जात आहे. जर वर्ष २००० मधील दरानुसार विचार केला, तर ही दरवाढ १२ ते ३६ टक्क्यांपर्यंत झाली आहे. असे असले, तरी ही दरवाढ केवळ नाममात्र असल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे.

इंधन समायोजन शुल्कावर प्रश्नचिन्ह

ऊर्जा तज्ज्ञ महेंद्र जिचकार यांनी इंधन समायोजन शुल्काबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे तात्पुरते शुल्क आहे. इंधनच्या दरावर ते अवलंबून असते. याला वीज दरात कसे काय जोडले जाऊ शकते. आता २.३५ रुपये प्रति युनिटच्या दराने हे शुल्क वसूल केले जात आहे. मागच्या एप्रिलमध्ये हे शुल्क २५ पैसे प्रति युनिट होते.

महावितरणच्या अकार्यक्षमतेमुळे दरवाढ

व्हीआयएचे आर.बी. गोयनका यांनी म्हटले आहे की, आयोगाने महावितरणच्या अनैतिक मागण्या पूर्ण केल्या नाही. आयाेगाने संतुलन साधले आहे. उद्योगांच्या दरात वाढ झालेली नाही, परंतु फिक्स्ड चार्ज वाढल्याने जवळपास ५ टक्के दरवाढ होईल. राज्यातील वीज दरवाढ ही महावितरणच्या अकार्यक्षमतेची देण आहे.

बीपीएल व कृषी ग्राहकांना फटका

० ते ३० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या बीपीएल ग्राहकांना आता अधिक पैसे द्यावे लागतील. या श्रेणीमध्ये जवळपास १० टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना आता १६ ते २६ टक्के अधिक पैसे द्यावे लागतील.

 

घरगुती वीजदराची तुलनात्मक स्थिती

 

विद्युत शुल्क - विलिंग शुल्क - व्हेरिएबल चार्ज - फिक्स्ड जार्च - वृद्धी वास्तविक (टक्के)

 

० से १०० युनिट

मार्च २०२३ पर्यंत : ३.३६ - १.३५ - ४.७१- १०५

२०२३ -२४ : ४.११ - १.१७ - ५.२८ - ११६.०० - १२.१०

२०२४-२५ : ४.७१ - १.१७ - ५.८८ - १२८.०० - २४.८४

१०१ ते ३००

मार्च २०२३ पर्यंत : ७.३४ - १.३५ - ८.६९ - १०५.००

२०२३-२४ : ९.६४ - १.१७ - १०.८१ - ११६.०० - २४.४०

२०२४-२५ : १०.२९ - १.१७ - ११.४६ - १२८.०० - ३१.८८

 

३०१ ते ५०० युनिट

मार्च २०२३ पर्यंत : १०.३७ - १.३५ - ११.७२ - १०५.००

२०२३-२४ : १३.६१ - १.१७ - १४.७८ - ११६.०० - २६.११

२०२४-२५ : १४.५५ - १.१७ - १५.७२ - १२८.०० -३४.३

५०१ युनिटपेक्षा अधिक

मार्च २०२३ पर्यंत : ११.८६ - १.३५ - १३.२१ - १०५.००

२०२३-२४ : १५.५७ - १.१७ - १६.७४- ११६.०० - २६.७२

२०२४-२५ : १६.६४ - १.१७ - १७.८१ - १२८.०० - ३४.८२

(नोट- मार्च २०२३ पर्यंतचे दर. आयोगाने मागच्या वर्षाच्या दरात इंधन समायोजन शुल्क जोडले आहे. सर्व आकडे रुपयामध्ये)

Web Title: The 'shock' of electricity price hike! The commission is saying a 2.9 percent increase, but the increase was 12 to 36 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज