आईने पाणी भरण्यास सांगितले म्हणून मुलाने साेडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 08:01 PM2023-01-25T20:01:13+5:302023-01-25T20:01:42+5:30

Nagpur News आईने पाणी भरण्यास सांगितले म्हणून मुलाने घर साेडल्याची घटना रामटेक शहरात मंगळवारी (दि.२४) घडली. रागाच्या भरात मुलाने सायकलने नागपूर गाठले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा शाेध घेऊन आईच्या स्वाधीन केले.

The son left the house as the mother asked him to fill the water | आईने पाणी भरण्यास सांगितले म्हणून मुलाने साेडले घर

आईने पाणी भरण्यास सांगितले म्हणून मुलाने साेडले घर

Next
ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांनी आणले परत

नागपूर : आईने पाणी भरण्यास सांगितले म्हणून मुलाने घर साेडल्याची घटना रामटेक शहरात मंगळवारी (दि.२४) घडली. रागाच्या भरात मुलाने सायकलने नागपूर गाठले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा शाेध घेऊन आईच्या स्वाधीन केले.

हितेश अशाेक चाैधरी (१५, रा. कवळक टेकडी, रामटेक) असे या मुलाचे नाव आहे. मंगळवारी त्याला आईने पाणी भरण्यास सांगितले. यावरून त्याला आईचा राग आला. आई कामावर गेल्यानंतर ताे स्वत:च्या सायकलने कपड्याची बॅग घेऊन नागपूरकडे निघाला. दरम्यान, रात्री ८ वाजेपर्यंत मुलगा घरी दिसून न आल्याने आईने त्याचा सर्वत्र शाेध घेतला. वारंवार फाेन केल्यानंतर ताे आईच्या रागावर घर साेडून निघून गेला व ताे नागपुरात असल्याचे कळताच आईने हंबरडा फाेडला.

शेजारी प्रफुल नागपुरे यांनी वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सचिव अजय मेहरकुळे यांना घटनेची माहिती दिली. लागलीच वाईल्ड चॅलेंजरचे अध्यक्ष राहुल काेठेकर, अजय मेहरकुळे, राहुल गुंडरे यांनी नागपूर गाठत मुलाचा शाेध सुरू केला. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, ट्रॅव्हल्स स्टेशन परिसरात त्याचा शाेध घेऊनही ताे कुठेही सापडला नाही. कार्यकर्त्यांनी निराश हाेऊन परत जाण्याचा निर्णय घेतला. अशातच एका चाैकात बंद दुकानासमाेर हितेश थंडीत कुडकुडत बसलेला दिसून आला. त्याची ओळख पटल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याची समजूत काढत घरी परत जाण्यास तयार केले. त्याला आपल्या वाहनात बसवून रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घरी परत आणले व आईच्या स्वाधीन केले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, महिलेचा पती सतत दारूच्या नशेत राहताे. हाॅस्पिटलमध्ये साफसफाई व लाेकांच्या घरी धुणीभांडी कामे करून ती संसाराचा गाडा चालविते. आपल्या एका मुलाला अभियांत्रिकी तर लहान मुलालासुद्धा चांगले शिक्षण देत आहे. आईला हातभार मिळावा म्हणून तिने हितेशला पाणी भरण्यास सांगितले. काम सांगण्यावरून ताे घर साेडण्याची धमकी देत आईवर ओरडला. यावर आईने मी सगळ्यांसाठी काम करावे व तुम्हाला माेठे करावे, तुमचे काहीच कर्तव्य नाही, असे म्हटले. हे ऐकून मुलाने हे पाऊल उचलल्याचे समजते.

Web Title: The son left the house as the mother asked him to fill the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.