चोरट्याने काजुचे डब्बे, रोख रक्कमेवर केला हात साफ

By दयानंद पाईकराव | Published: June 20, 2023 03:22 PM2023-06-20T15:22:51+5:302023-06-20T15:23:27+5:30

२ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल चोरी

The thief made off with cashew boxes and cash | चोरट्याने काजुचे डब्बे, रोख रक्कमेवर केला हात साफ

चोरट्याने काजुचे डब्बे, रोख रक्कमेवर केला हात साफ

googlenewsNext

नागपूर : काजु कंपनीतील काजुचे डब्बे आणि २.१६ लाख रुपये रोख असा एकुण २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल पळविणाऱ्या आरोपीविरुद्ध वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनोज सुनिल खेडकर (वय ३४, रा. जय गुरुदेवनगर, मानेवाडा) यांची वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत छत्तरपूर फार्म हाऊस रोडच्या बाजुला निधीशहा काजु कंपनी आहे. रविवारी १८ जूनला ते रात्री ८ वाजता कंपनी बंद करून घरी गेले. अज्ञात आरोपीने रात्री ८ ते सकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान कंपनीच्या मागील दाराच्या फटीतून हात टाकून दाराची कडी काढून कंपनीत प्रवेश केला. आरोपीने कंपनीतील ८० किलो काजुचे ८ टब्बे व टेबलच्या ड्रॉवरमधून रोख २ लाख १६ हजार असा एकुण २ लाख ७६ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला.

या प्रकरणी खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा ठाण्याचे उपनिरीक्षक रविंद्र चव्हाण यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. काजु कंपनीत सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र, चोरट्याने सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेल्यामुळे ही घटना सीसीटीव्हीत कैद होऊ शकली नाही.

Web Title: The thief made off with cashew boxes and cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.