नागपुरात ५ फेब्रुवारीला रंगणार सहाव्या महामॅरेथॉनचा थरार; नोंदणीसाठी अखेरचे काही दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 04:23 PM2023-01-04T16:23:31+5:302023-01-04T16:36:23+5:30

धावपटूंची उत्सुकता शिगेला : आपली नोंदणी तत्काळ करून सहभाग निश्चित करा

The thrill of the 6th Lokmat Maha Marathon will be held in Nagpur on February 5 | नागपुरात ५ फेब्रुवारीला रंगणार सहाव्या महामॅरेथॉनचा थरार; नोंदणीसाठी अखेरचे काही दिवस शिल्लक

नागपुरात ५ फेब्रुवारीला रंगणार सहाव्या महामॅरेथॉनचा थरार; नोंदणीसाठी अखेरचे काही दिवस शिल्लक

googlenewsNext

नागपूर : नाशिक आणि औरंगाबाद महामॅरेथॉनच्या प्रचंड यशानंतर मुंबई मॅरेथॉनचे पदार्पणही दणक्यात झाले. या महामॅरेथॉनमध्ये राज्यभरातील धावपटूंनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आता विदर्भाची राजधानी नागपूर शहरात ५ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक कस्तरचंद पार्कवर महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटू, नागरिकांची दिवसागणिक संख्या वाढत आहे. आता नोंदणीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे धावपटूंनी तत्काळ आपली नोंदणी करून सहभाग निश्चित करण्याची वेळ आली आहे. नागपूर ‘लोकमत महामॅरेथॉन’चे यंदा हे सहावे पर्व आहे.

विशेष बाब म्हणजे ‘लोकमत’ महामॅरेथॉनला असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेसतर्फे (एम्स) पात्रता दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही या महामॅरेथॉनला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची पर्वणी राज्यभरातील धावपटूंना मिळाली आहे. अनेक लोकप्रियतेचे व यशाचे शिखर गाठलेल्या या महामॅरेथॉनमध्ये २६ जानेवारीपर्यंत आपला सहभाग निश्चित करावा.

सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात ‘लोकमत’ने यशाची अनेक शिखरे याआधीच पादाक्रांत केली आहेत. सर्व जातीधर्मातील नागरिकांना एका छताखाली आणून सामाजिक एकोपा निर्माण करणे, समाजात आरोग्य, तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने ‘लोकमत’ समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदा ‘लोकमत’ महामॅरेथॉनचा श्रीगणेशा नाशिक शहरात २० नोव्हेंबरला झाला. त्यानंतर महामुंबई मॅरेथॉन ४ डिसेंबर रोजी झाली. औरंगाबादेत १८ डिसेंबर रोजी महामॅरेथॉनचे आयोजन पार पडले. या तिन्ही महामॅरेथॉनला राज्यभरातील धावपटू व नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यापुढील महामॅरेथॉनचे आयोजन कोल्हापूर येथे ८ जानेवारी रोजी होत आहे.

आता नागपूरच नव्हे तर राज्यभरातील धावपटू सहभागी होण्यासाठी आतूर झाले असून, नोंदणीलाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महामॅरेथॉनला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे धावपटू, नागरिक शहरातील विविध मैदानांवर कसून सराव करीत आहेत. जगभरात प्रसिद्ध असणारे टोकियो, लंडन, न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉनला साजेल, अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची ‘लोकमत’ समूहाची महामॅरेथॉन असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सहभागी धावपटूंत नेहमीच असते. सहभागी होणाऱ्या धावपटूंनी अधिक माहितीसाठी ९९२२२०००६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

१२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके

यंदा ही महामॅरेथॉन तीन किमी, पाच किमी, १० किमी, २१ किमी तसेच डिफेन्स गटात ही २१ किमी अंतरात होत आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच १० व २१ किमी अंतराच्या मॅरेथाॅनमधील धावपटूंना टायमिंग सर्टिफिकेट, बक्षिसे देण्यात येणार आहेत. पोलिस दल, आर्मी, नेव्ही, होमगार्ड, फॉरेस्ट या सेवेत असलेल्यांसाठी २१ किमी डिफेन्स हा गट असून, त्यांच्यासाठी बक्षिसे असणार आहेत. १२ लाख रुपयांपर्यंत घसघशीत बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

ऑनलाइन नोंदणीसाठी

१५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्या धावपटूंना १५ टक्के शुल्क सवलत दिले जाईल. महामॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त धावपटूंनी सहभाग निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

https://www.townscript.com/e/nagpur-mahamarathon-2023 या लिंकवर वैयक्तिक आणि ग्रुप रजिस्ट्रेशनही करू शकता. याव्यतिरिक्त नागपूरमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या धावपटूंनी क्यूआर कोड स्कॅन करावा आणि ऑनलाइनद्वारे आपला सहभाग निश्चित करावा. 

ग्रुप रजिस्टेशनही करता येणार

लोकमत महामॅरेथॉनमध्ये ५० च्या संख्येच्या समूहाने सहभागी झाल्यास शुल्कात ३० टक्के सवलत मिळण्याची संधी धावपटूंना असणार आहे. अधिक माहितीसाठी ९९२२२०००६३, १८८१७४९३९० या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: The thrill of the 6th Lokmat Maha Marathon will be held in Nagpur on February 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.