गावातच होणार उपचार अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्व सर्कलमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजित करणार

By गणेश हुड | Published: June 14, 2024 09:48 PM2024-06-14T21:48:06+5:302024-06-14T21:48:36+5:30

खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. याचा विचार करता सेस फंडातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

The treatment will be done in the village itself and at zero cost; Health camps will be organized in all circles of G.P | गावातच होणार उपचार अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्व सर्कलमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजित करणार

गावातच होणार उपचार अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्व सर्कलमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजित करणार

नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येण्याची गरज भासू नये, त्यांना गावातच ता डॉक्टरांच्या मदतीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागातर्फे जुलै महिन्यात जिल्हा परिषदेच्या  सर्व सर्कलमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शुक्रवारी आरोग्य समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष व आरोग्य समितीच्या सभापती कुंदा राऊत यांनी दिली.

खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. याचा विचार करता सेस फंडातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या चमूत मेयो, मेडिकल, खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश राहणार आहे. जिल्हा परिषदेचे ५८ सर्कल आहेत. प्रत्येक सर्कलमध्ये शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. या शिबिरात कान-नाक-घसा रोगतज्ज्ञ यांच्यासह नामांकित डॉक्टर सहभागी होणार आहेत. तसेच एक्स-रे मशीन, ईसीजी मशीनसह इतरही साधनसामग्री उपलब्ध राहणार असल्याने ग्रामीण भागातील  रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे. 

जिल्हा नियोजन समितीने वित्त वर्षात मंजूर केलेल्या  नियतव्ययाच्या अनुषंगाने  कामांचे तातडीने नियोजन करण्याबाबत सर्व संबंधीतांना सूचना देण्यात आल्या. यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे बांधकाम व दुरुस्ती, औषध खरेदी आदी कामांचा  समावेश आहे. आरोग्य केंद्रांच्या वीज बिलासाठी ४५ लाखांचा निधी मंजूर असून या निधीचे वाटप करण्याची सूचना करण्यात आली. तसेच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका खरेदीसाठी नियोजन समितीकडून एक कोटीचा निधी मंजूर आहे. याचे नियोजन करण्याचे निर्देश कुंदा राऊत यांनी दिले. यावेळी समितीचे सदस्य व आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The treatment will be done in the village itself and at zero cost; Health camps will be organized in all circles of G.P

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.