नाट्य संमेलनात रंगणार ९९ अध्यक्षांची संमेलनवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 08:31 PM2019-02-23T20:31:41+5:302019-02-23T20:35:26+5:30

नाट्य संमेलनाच्या इतिहासातील आतापर्यंतचे ९९ संमेलनाध्यक्ष या सर्वांच्या कर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी नागपूरच्या नाट्य परिषद शाखेने अध्यक्षांच्या कामाचा वेध घेणारी संमेलनवारी यंदाच्या नाट्य संमेलनाचं आकर्षण ठरणार आहे. नागपूरच्या ९९ व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि आधीच्या ९८ नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या कार्याचा लेखाजोखा या कार्यक्रमात मांडण्यात येणार आहे. यात नागपुरातील २०० कलाकार सहभागी होणार आहेत. हा अतिशय आकर्षक कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात रंगणार आहे.

Theatering of 99 president will be held in the Natya Sammelan | नाट्य संमेलनात रंगणार ९९ अध्यक्षांची संमेलनवारी

नाट्य संमेलनात रंगणार ९९ अध्यक्षांची संमेलनवारी

Next
ठळक मुद्दे२०० कलाकार रंगवणार अध्यक्षांचा जीवनपट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाट्य संमेलनाच्या इतिहासातील आतापर्यंतचे ९९ संमेलनाध्यक्ष या सर्वांच्या कर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी नागपूरच्या नाट्य परिषद शाखेने अध्यक्षांच्या कामाचा वेध घेणारी संमेलनवारी यंदाच्या नाट्य संमेलनाचं आकर्षण ठरणार आहे. नागपूरच्या ९९ व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि आधीच्या ९८ नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या कार्याचा लेखाजोखा या कार्यक्रमात मांडण्यात येणार आहे. यात नागपुरातील २०० कलाकार सहभागी होणार आहेत. हा अतिशय आकर्षक कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात रंगणार आहे.
या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या अडीच तासात ९९ संमेलानाध्यक्षांच्या कार्याचा जीवनपट अनोख्या पद्धतीने उलगडण्याचं आव्हान नागपूरच्या नाट्य परिषद शाखेने उचललं आहे. यात पहिल्या संमेलनापासून ते ९९ व्या संमेलनातील प्रत्येकाची जातीने दखल घेण्यात येणार आहे. न. चि. केळकर, दादासाहेब खापर्डे, विष्णू दिगंबर पलुस्कर, बालगंधर्व, अनंत गद्रे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, विद्याधर गोखले या दिग्गज नाट्यकर्मींच्या आठवणीना यावेळी उजाळा देण्यात येणार आहे.
या संपूर्ण अडीच तासाच्या कार्यक्रमात या ९९ दिग्गज नाट्यकर्मींच्या नाटकातील प्रसंग, नाट्यपदे, त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणांचा संवाद याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना देवेंद्र बेलनकर यांची आहे. संमेलनाचा अध्यक्ष हे प्रत्येक नाट्य संमेलनातील एक आकर्षण असतं. तसेच त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ते काय बोलणार, याचीच सगळ्यांनाच जास्त उत्सुकता असते. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या अध्यक्षांचा हा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न या संमेलनवारी कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. नितीन नायगांवकर, नरेश गडेकर, रूपाली मोरे या नागपूरच्या रंगकर्मींनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

Web Title: Theatering of 99 president will be held in the Natya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.