कुटुंबासह बाहेरगावी गेले, चोरटयाने २.१२ लाख पळविले
By दयानंद पाईकराव | Updated: May 23, 2024 18:09 IST2024-05-23T18:08:07+5:302024-05-23T18:09:36+5:30
Nagpur : आरोपीने घरी कोणीच नसल्याची संधी साधून केली घरफोडी

Theft 2.12 lakhs when there was no one in the house
नागपूर : कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील दागीने आणि रोख रक्कम असा एकुण २ लाख १२ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिपा देवेंद्र देवांगणा (४०, रा. ओम साईनगर, पुणापूर चौक, पारडी) या १४ ते २१ मे दरम्यान आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबीयांसह छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने लाकडी आलमारीतील सोन्याचांदीचे दागीने व रोख १ लाख ५० हजार असा एकुण २ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दिपा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.