शेतातील घरातून शेतीपयाेगी साहित्याची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:16+5:302021-07-17T04:08:16+5:30
उमरेड : चाेरट्याने शेतातील घरातून १६,७०० रुपये किमतीचे शेतीपयाेगी व इतर साहित्य चाेरून नेले. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या ...
उमरेड : चाेरट्याने शेतातील घरातून १६,७०० रुपये किमतीचे शेतीपयाेगी व इतर साहित्य चाेरून नेले. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडगाव शिवारात बुधवारी (दि. १४) मध्यरात्री घडली.
प्रवीण कृष्णराव बाेटकेवार (५५, रा. नंदनवन, नागपूर) यांवी पारडगाव (ता. उमरेड) शिवारातील शेती आहे. त्यांच्या शेतात घर असून, त्या घरात काही शेतीुपयाेगी साहित्य ठेवले आहे. चाेरट्याने शेतात कुणीही नसल्याचे पाहून दाराची कडून ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने लाेखंडी सब्बल, पान्हे, पेनचिस, हाताेडा, गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, ट्रॅक्टरचे फास, तुटलेली फाळ, इलेक्ट्रिक माेटरपंप, बॅटरी, ट्रकचा लाेखंडी जॅक व इतर शेतीउपयाेगी साहित्य चाेरून नेले. या साहित्याची एकूण किंमत १६,७०० रुपये असल्याची माहिती प्रवीण बाेटकेवार यांनी पाेलिसांना दिली. या प्रकरणी उमरेड पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार हरीश यंगलवार करीत आहेत.