गोदाम फोडून सुपारीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:11 AM2021-08-14T04:11:14+5:302021-08-14T04:11:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - धावडे मोहल्ल्यातील सुपारीचे गोदाम फोडून चोरट्यांनी ८० हजारांची सुपारी लंपास केली. ११ ते १२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - धावडे मोहल्ल्यातील सुपारीचे गोदाम फोडून चोरट्यांनी ८० हजारांची सुपारी लंपास केली. ११ ते १२ ऑगस्टच्या रात्री ही घरफोडीची घटना घडली.
महेश गंगाधर गाैरीकर (वय ३१, रा. जुनी मंगळवार) हे सुपारीचे व्यापारी आहेत. त्यांचे लकडगंजमधील धावडे मोहल्ल्यात गोदाम आहे. या गोदामात हजारोंची सुपारी ठेवून असते. ११ ऑगस्टच्या रात्री त्यांनी गोदाम बंद केले. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे गोदाम उघडण्यासाठी आले. कुलूप उघडून आत गेले असता आतमधील दार त्यांना उघडे दिसले. आतमधून सुपारीचे ८ पोते चोरीला गेल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. चोरीला गेलेल्या सुपारीची किंमत ८० हजार रुपये आहे. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
विशेष म्हणजे, प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी, पानमसाल्याची लकडगंज परिसरातून तस्करी केली जाते. मोठमोठ्या गोदामात माल साठवला जातो आणि तेथून तो पद्धतशीरपणे इकडे तिकडे पोहोचविलाही जातो. चोरट्यांना त्याची माहिती आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना तिकडे नेहमीच घडतात. अनेक प्रकरणांत तक्रारीही दाखल करण्याचे टाळले जाते.
----