शेतातून बांधकाम साहित्याची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:12 AM2021-08-21T04:12:57+5:302021-08-21T04:12:57+5:30
माैदा : शेतात बांधकामासाठी ठेवलेल्या सिमेंटच्या बॅगा व लाेखंडी सळाकी चाेरट्याने लंपास केल्या. त्या साहित्याची एकूण किंमत ४१ हजार ...
माैदा : शेतात बांधकामासाठी ठेवलेल्या सिमेंटच्या बॅगा व लाेखंडी सळाकी चाेरट्याने लंपास केल्या. त्या साहित्याची एकूण किंमत ४१ हजार रुपये आहे. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरव्हा शिवारात गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.
शिवाराम संपतराव राजगिरे (६०, रा. चिरव्हा, ता. माैदा) यांचे चिरव्हा शिवारात शेत आहे. त्यांनी शेतात गाेदामाचे बांधकाम सुरू केले असून, तिथे काही बांधकाम साहित्य ठेवले आहे. मध्यरात्री तिथे कुणीही नसताना चाेरट्याने १५ हजार रुपये किमतीच्या ५० बॅग सिमेंट व व ३६ हजार रुपये किमतीच्या नऊ क्विंटल लाेखंडी सळाकी असा एकूण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच शिवराम राजगिरे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक ठाकूर करीत आहेत.