नागपुरातील२९ वर्षे जुन्या प्रकरणात चोरट्याला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:37 PM2018-05-16T23:37:15+5:302018-05-16T23:37:25+5:30
३९० रुपये चोरीच्या प्रकरणावर तब्बल २९ वर्षांनंतर निर्णय आला आहे. त्या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चोरट्याला भादंविच्या कलम ४५७ व ३८० अंतर्गत प्रत्येकी १५ दिवसाचा कारावास व २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एम. टी. खराटे यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ३९० रुपये चोरीच्या प्रकरणावर तब्बल २९ वर्षांनंतर निर्णय आला आहे. त्या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चोरट्याला भादंविच्या कलम ४५७ व ३८० अंतर्गत प्रत्येकी १५ दिवसाचा कारावास व २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एम. टी. खराटे यांनी हा निर्णय दिला.
मो. शाहीद वल्द नेवल मो. हफिज असे आरोपी चोरट्याचे नाव असून तो मोमीनपुरा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध जागनाथ बुधवारी येथील मो. हुसैन वल्द अली हुसैन यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ही घटना ११ नोव्हेंबर १९८९ रोजीच्या मध्यरात्रीनंतरची आहे. मोमीनपुरा येथे फिर्यादीचे जनरल स्टोअर्स आहे. आरोपीने दुकानाच्या खिडकीतून आत प्रवेश करून रोख ३९० रुपये चोरले होते. आरोपीला ८ डिसेंबर १९८९ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. पोलीस उपनिरीक्षक मो. इकबाल यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे अॅड. व्ही. डी. हुकरे यांनी बाजू मांडली.