कळमन्यात लाखोच्या फळांची चोरी : नारे-निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 08:55 PM2020-09-26T20:55:42+5:302020-09-26T20:59:04+5:30
कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात प्रशासनाविरोधात नारे-निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना फळे बाजारात यंदाच्या हंगामात फळे चोरीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या घटनांवर प्रशासकाला नियंत्रण आणण्यात अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी आडतिया आणि व्यापाºयांनी फळांचा लिलाव बंद पाडून बाजारात प्रशासनाविरोधात नारे-निदर्शने केली.
प्राप्त माहितीनुसार, दरवर्षी फळे चोरीच्या घटना घडतातच, पण यंदा यात वाढ झाली आहे. या संदर्भात प्रशासक राजेश भुसारी आणि कळमना पोलिसांना माहिती दिली आहे. यावर नियंत्रण आणण्यात दोघांनाही अपयश आले आहे. याचा निषेध म्हणून शनिवारी नारे-निदर्शने करण्यात आली. त्यानंतरही फळे अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांच्या कार्यालयात प्रशासक राजेश भुसारी, कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, आडतिये, व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चोरीच्या घटनांवर आळा घालण्याचे आश्वासन प्रशासक आणि पोलिसांनी दिले. त्यानंतरच लिलाव प्रक्रिया पार पडली.
आनंद डोंगरे म्हणाले, एक टन मोसंबी ३० हजार रुपयांची होते. चिखली आणि लगतच्या भागातील असामाजिक तत्त्व व गुंड प्रवृत्तीचे लोक रात्री सुरक्षा रक्षक आणि शेतकऱ्यांना शस्त्रे दाखवून फळे चोरून नेतात. ते संख्येने जास्त असल्याने त्यांच्यावर आळा घालणे सुरक्षा रक्षकांनाही कठीण जाते. अशा घटनांची माहिती पोलिसांनाही दिली आहे. पण आतापर्यंत चोरटे सापडले नाहीत. तसे पाहिल्यास ५०० रुपयांचा कृषी माल सेस दिल्याविना कळमन्याच्या गेटबाहेर जात नाही. असे असताना चोरटे लाखोंचा माल चोरटे कसा घेऊन जातात, यावर प्रश्नचिन्ह आहे. प्रशासक आश्वासन देण्यापलीकडे काहीच करीत नाहीत. पाच वर्षांनंतर गेल्या महिन्यात कळमन्याच्या मुख्यदारातून ये-जा सुरू झाली आहे. चिखली गेटकडून चोरटे शस्त्राच्या जोरावर माल बाहेर नेतात. यात शेतकºयांचे जास्त नुकसान होते.
बाजारात अस्वच्छता
कळमन्यात संपूर्ण विदर्भासह नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यातून मोसंबी आणि संत्र्याची आवक वाढली आहे. मोसंबीचे जवळपास २०० आणि संत्र्याचे ५० ते ६० टेम्पो दररोज येत आहेत. त्यामुळे खराब माल बाजारात पडून राहतो. त्याची उचल करण्यात येत नसल्याने बाजारात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासकाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे फळे बाजारात अस्वच्छतेचा कळस झाल्याचे डोंगरे म्हणाले.
बैठकीत १०० पेक्षा जास्त अडतिया, २५० व्यापारी आणि खरेदीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.