कंपन्यांच्या आवारातून साहित्याची चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:37+5:302021-08-24T04:11:37+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा/बुटीबाेरी : चाेरट्यांनी कंपन्यांच्या आवारात पडून असलेले दोन लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचे विविध साहित्य ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा/बुटीबाेरी : चाेरट्यांनी कंपन्यांच्या आवारात पडून असलेले दोन लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचे विविध साहित्य चाेरून नेले. या दाेन्ही घटना माैदा व बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अनुक्रमे आसाेली व आसाेला (सावंगी) शिवारात घडल्या.
नागपूर - भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील आसाेली (ता. कामठी) शिवारात झेडएल प्लॅस्टिक कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्यांनी तिथून चार इलेक्ट्रिक माेटार, इलेक्ट्रिक वजन काटा, शिलाई मशीन, पान्ह्यांचा सेट, ३०० मीटर केबल व डीव्हीआर मशीन असे एकूण एक लाख बारा हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच मुखत्यार ताज शेख (४५, रा. माेठा ताजबाग, उमरेड राेड, नागपूर) यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली.
चाेरीची दुसरी घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आसाेला (सावंगी, ता. हिंगणा) शिवारात घडली. या शिवारातून समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने तसेच या कामाचे कंत्राट घेतलेल्या मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर नामक कंपनीने त्यांचे बांधकाम साहित्य या शिवारात ठेवले हाेते. तिथे कुणीही नसल्याने चाेरट्यांनी तिथून दहा नग लाेखंडी प्लेट व सात बंडल लाेखंडी सळाकी असा एकूण एक लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.
चाेरी झाल्याचे लक्षात येताच कंपनीचे व्यवस्थापक विवेककुमार वर्मा (२६) यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या दाेन्ही घटनांमध्ये माैदा व बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनांचा तपास अनुक्रमे पाेलीस उपनिरीक्षक ठाकूर व पाेलीस उपनिरीक्षक माेरघडे करीत आहेत.