दूध शीतकरण केंद्र कार्यालयात चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:27+5:302021-05-12T04:09:27+5:30
रामटेक : चाेरट्याने दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या कार्यालयात प्रवेश केला आणि आतील ३० हजार रुपये किमतीचे विविध साहित्य ...
रामटेक : चाेरट्याने दूध संकलन व शीतकरण केंद्राच्या कार्यालयात प्रवेश केला आणि आतील ३० हजार रुपये किमतीचे विविध साहित्य चाेरून नेले. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हमलापुरी येथे नुकतीच घडली.
रामटेक-हमलापुरी मार्गावर खासगी कंपनीचे दूध शीतकरण केंद्र व त्याचे कार्यालय आहे. त्या कार्यालयात मध्यरात्रीच्या सुमारास कुणीही नसताना चाेरट्याने प्रवेश केला आणि आतील साहित्य चाेरून नेले. यात चाेरट्याने २० हजार रुपये किमतीचा लॅपटाॅप व १० हजार रुपये किमतीचे प्रिंटर असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेल्याची माहिती सहायक व्यवस्थापक गाेपाल ईश्वर श्रावणकर (४२, रा. नगरधन, ता. रामटेक) यांनी पाेलिसांना दिली. या प्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक बाेरकर करीत आहेत.