कोरोनामुक्तीसाठी ‘त्यांची’ धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:00+5:302021-05-07T04:09:00+5:30

भिवापूर : तालुक्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ उतरतो आहे. बरे होणाऱ्यांची आकडेवारी दिलासा देणारी आहे. आरोग्य व्यवस्थेतील योद्धे कोविड केअर सेंटरमध्ये ...

‘Their’ struggle for coronation | कोरोनामुक्तीसाठी ‘त्यांची’ धडपड

कोरोनामुक्तीसाठी ‘त्यांची’ धडपड

Next

भिवापूर : तालुक्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ उतरतो आहे. बरे होणाऱ्यांची आकडेवारी दिलासा देणारी आहे. आरोग्य व्यवस्थेतील योद्धे कोविड केअर सेंटरमध्ये सतत ७ दिवस २४ तास मुक्कामी राहून कोरोनामुक्तीसाठी धडपडत आहेत. त्यामुळे डॉक्टर, तुम्ही देव नाही; पण देवदूत आहात, असा सूर आता रुग्णांचे नातेवाईक अभिव्यक्त करत आहे. तालुक्यात आतापर्यंत २,३८० रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १,६७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ६१७ रुग्ण गृहविलगीकरणात, तर १६ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत ६२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकंदरीत तालुक्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अशा भीषण परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग आणि कोविड केअर सेंटरमधील कार्यरत योद्ध्यांचे योगदान मोठे आहे. कुठलीही सुटी न घेता, सतत सात दिवस २४ तास कोविड केअर सेंटरमध्ये मुक्कामी राहून हे योद्धे कोरोनाशी दोन हात करत आहेत. यात डॉ. शिशिर गोस्वामी, डॉ. प्रशांत हिवरकर, डॉ. अजय बन्सोड, डॉ. कल्यानी बारसाकडे, डॉ. श्रुतिका गवरे, डॉ. वृषाली श्रीखंडे, राणी भुरे, श्रुष्टी डोंगरे, मीनल चिखले, जयश्री मोहोड, हेमा वाघमारे, रेश्मा वाघमारे, गायत्री तेलंग, शुभांगी वाघमारे, अश्विनी घरटे, सुखदेव मांडरे, अशरफ पठान, सूरज सेलोकर, प्रणय खोब्रागडे, जयश्री गजभिये, वंदना रामटेके, गणेश रवारे, विनोद डहारे, सुनील महतकर, तेजस वनकर आदींचा यात समावेश आहे. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत, अधिक्षीका डॉ. दर्शना गणवीर, ठाणेदार महेश भोरटेकर, खंडविकास अधिकारी माणिक हिमाणे, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनात तालुक्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे.

वर्दीतले माणूसपण

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत पोलिसांचे योगदान लाखमोलाचे ठरत आहे. एरवी रोखठोक राहणाऱ्या खाकी ‘वर्दी’तसुध्दा ‘दर्दी’ माणसं असतात याचा परिचय कोविड सेंटरच्या रुग्णांना येत आहे. कारण कोरोनावर मात करण्यासाठी औषधोपचारासह फळ व पौष्टिक आहारसुध्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी पोलीस बांधवांकडून कोविड सेंटरमधील रुग्णांना विविध फळे पुरविण्यात येते आहे.

--

पोलीस बांधवांनी पाठविलेली फळे रुग्णांना देताना कोविड सेंटरमधील कर्मचारी.

Web Title: ‘Their’ struggle for coronation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.