...तर दीड ते दोन रुपयांनी वीज स्वस्त होणार; लोकेश चंद्र यांचा दावा : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 07:34 AM2024-09-20T07:34:37+5:302024-09-20T07:35:00+5:30

या योजनेंतर्गत मार्च २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट सौरऊर्जा तयार  करण्यासाठी महाराष्ट्र सोलर ॲग्रो लिमिटेडची स्थापना केली आहे.

...then electricity will be cheaper by one and a half to two rupees; Lokesh Chandra's claim: Chief Minister Solar Agriculture Channel | ...तर दीड ते दोन रुपयांनी वीज स्वस्त होणार; लोकेश चंद्र यांचा दावा : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी

...तर दीड ते दोन रुपयांनी वीज स्वस्त होणार; लोकेश चंद्र यांचा दावा : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी

नागपूर : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० लागू झाल्यानंतर राज्यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक विजेचा दर १.५ ते २ रुपये प्रतियुनिटने स्वस्त होईल, असा दावा महावितरणचे अध्यक्ष तथा सहव्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केला आहे. या योजनेंतर्गत मार्च २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट सौरऊर्जा तयार  करण्यासाठी महाराष्ट्र सोलर ॲग्रो लिमिटेडची स्थापना केली आहे.

५० हजार एकर जमीन संपादन

या योजनेसाठी आतापर्यंत ५० हजार एकर सरकारी जमीन निश्चित करण्यात आली आहे. योजनेंतर्गत ९,२०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. डिसेंबरपर्यंत ५०० मेगावॅट उत्पादन सुरू होईल.

३,५०० मेगावॅटच्या आणखी कार्यादेश देण्यात येणार आहेत.  मार्च २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांमध्ये कृषिपंप जोडणीला खूप मागणी आहे.

शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्यासाठी जमा

केली जाणारी क्रॉस सबसिडी संपुष्टात येईल आणि वीज दरामध्ये  २ रुपये प्रतियुनिटपर्यंत कपात होईल. शेतकऱ्यांना दिवसा वीजही मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत उपकेंद्राजवळ सौरऊर्जा प्रकल्प उभारून त्यातून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांना देण्याची योजना आहे. त्यासाठी सरकारी जमिनीचा वापर केला जात आहे. जिथे सरकारी जागा उपलब्ध नाही, तिथे लोकांकडून जमिनी घेतल्या जात आहेत.

- लोकेश चंद्र,  अध्यक्ष तथा सहव्यवस्थापकीय संचालक

Web Title: ...then electricity will be cheaper by one and a half to two rupees; Lokesh Chandra's claim: Chief Minister Solar Agriculture Channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.