- तर पाणी विकत घ्यावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:29 AM2017-08-03T02:29:15+5:302017-08-03T02:29:34+5:30

पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. नागपूरकर पावसाच्या आशेवर जगताहेत.

- Then have to buy water | - तर पाणी विकत घ्यावे लागेल

- तर पाणी विकत घ्यावे लागेल

Next
ठळक मुद्देतोतलाडोह धरणात केवळ ११ टक्के साठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. नागपूरकर पावसाच्या आशेवर जगताहेत. अशातच विभागातील १८ मोठ्या धरणांतील जलसाठ्यात रोज घट होत आहे. पावसाने यंदा पाठ फिरवली तर नागपूरकरांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ निश्चितच येणार आहे. नागपूरला पाणीपुरवठा होणाºया तोतलाडोह धरणात आजमितीला केवळ ११ टक्के साठा शिल्लक आहे.
आॅगस्ट महिना लागला तरी नागपुरात अजूनही पावसाला खºया अर्थाने सुरुवात झालेली नाही. परिणामी जलाशये कोरडीच आहेत. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २२ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी याच तारखेला ५३ टक्के जलाशये भरली होती. नागपूर जिल्ह्यातील स्थिती तर याहून भयावह आहे. नागपुरातील सर्वात मोठे धरण असलेल्या तोतलाडोहमध्ये केवळ ११ टक्के पाणी आहे. गेल्यावर्षी याच दिवशी तब्बल ६६ टक्के इतका पाणीसाठा होता, हे विशेष.

गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यातील धरणातील पाणीसाठा आणि यंदाच्या पाणीसाठ्याचा विचार केल्यास परिस्थिती गंभीर आहेच. ४० ते ६० टक्के पाणीसाठा कमी आहे. तरीही आॅगस्ट महिन्यात पाऊस चांगला पडत असल्याने ही परिस्थिती सुधारेल असा विश्वास आहे. धरणे भरण्यासाठी आता केवळ रिमझिम पाऊस पडून चालणार नाही. धो-धो पावसाची गरज आहे. १५ दिवस पाऊस न पडल्यास परिस्थिती बिघडू शकते. कारण तेव्हा खरीप पिकांसाठी पाण्याची मागणी जास्त वाढेल.
- एस.जी. ढवळे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

सध्या तरी पाण्याची अडचण नाही. तशा तक्रारीसुद्धा नाही. पेरण्या झालेल्या आहेत. पावसाने दडी मारण्याने रोवण्या मात्र रखडल्या आहेत. पावसाची प्रतीक्षा आहेच.
- सुभाष चौधरी
उपजिल्हाधिकारी (महसूल)

Web Title: - Then have to buy water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.