- तर चॅरिटी वकिलांवर आत्महत्येची वेळ येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 09:14 PM2020-06-11T21:14:46+5:302020-06-11T21:16:26+5:30

धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

- Then it will be time for charity lawyers to commit suicide | - तर चॅरिटी वकिलांवर आत्महत्येची वेळ येईल

- तर चॅरिटी वकिलांवर आत्महत्येची वेळ येईल

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : चॅरिटी बार असोसिएशनने मांडली कैफियत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज आणखी काही महिने बंद राहिल्यास या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या वकिलांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी कैफियत चॅरिटी बार असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
कोरोना संक्रमणामुळे धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज गेल्या दोन महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय करणाºया वकिलांचे अर्थार्जन थांबले आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. वकिली हा प्रतिष्ठित व्यवसाय आहे आणि वकिलांना समाजामध्ये मानाचे स्थान असते. त्यांच्याकडे सन्मानाने बघितले जाते. परिणामी, वकील रेशनकरिता रांगेत उभे राहू शकत नाही किंवा कुणाकडे मदतीसाठी हात पसरू शकत नाही. कोरोनामुळे वकिलांवर अत्यंत वाईट परिस्थिती ओढवली आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वकिलांचे अर्थार्जन सुरू होण्यासाठी धर्मादाय कार्यालयातील न्यायिक कामकाज तातडीने सुरू करण्यात यावे. वकिलांना स्वत:च्या जबाबदारींची जाणिव आहे. त्यामुळे न्यायिक कामकाज सुरू झाल्यानंतर ते शारीरिक अंतर व अन्य नियमांचे काटेकोर पालन करतील. तसेच, ते पक्षकार व इतरांनाही नियमांचे पालन करायला लावतील असे संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद गोडे व सचिव श्रीगणेश अभ्यंकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: - Then it will be time for charity lawyers to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.