Unnao Case : उत्तर प्रदेशातील न्यायालयात खटला चालला असता तर सेंगर निर्दोष सुटला असता, नवाब मलिकांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 05:30 PM2019-12-16T17:30:25+5:302019-12-16T18:40:25+5:30

Unnao Case : 2017मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या उन्नाव तरुणी अपहरण आणि बलात्कार प्रकरणात तीस हजारी कोर्टानं भाजपाचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवले आहे

Then Kuldeep Singh Sanger would have been acquitted | Unnao Case : उत्तर प्रदेशातील न्यायालयात खटला चालला असता तर सेंगर निर्दोष सुटला असता, नवाब मलिकांचा टोला

Unnao Case : उत्तर प्रदेशातील न्यायालयात खटला चालला असता तर सेंगर निर्दोष सुटला असता, नवाब मलिकांचा टोला

Next

नागपूर - उन्नाव येथील एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर याला दोषी ठरवले आहे. दरम्यान, या खटल्याच्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपाला टोला लगावला आहे.  हा खटला उत्तरप्रदेशात चालला असता तर ते कदाचित दोषी ठरले नसते असेही ते पुढे म्हणाले जमलं परंतु तो उत्तर प्रदेशात बाहेर दिल्ली चालल्याने त्यांना दोषी ठरविण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे.

उन्नाव प्रकरणी लागलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, ‘’उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार कुलदीप सेंगर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरविले  आहे. हा खटला उत्तरप्रदेशात चालला असता तर ते कदाचित दोषी ठरले नसते.  परंतु  हा  खटला उत्तर प्रदेशाबाहेर दिल्ली चालल्याने त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे यासह भाजपचे अन्य आमदार  माजी मंत्री यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत त्यांच्यावरील खटले संबंधित राज्यात  चालवता राज्याबाहेर चालवले जावेत, अशी मागणी त्यांनी पुढे केली.

वर्षं 2017मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या उन्नाव तरुणी अपहरण आणि बलात्कार प्रकरणात तीस हजारी कोर्टानं भाजपाचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवलं आहे. तर महिला सहकारी असलेल्या शशी सिंह यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. तीस हजारी कोर्टाचे न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी हा निर्णय सुनावला असून, 19 डिसेंबरला सेंगरला कोणती शिक्षा ठोठावायची यावर निर्णय होणार आहे. 

न्यायालयानं 10 डिसेंबरला सर्वच पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय 16 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला होता. आज सुनावणी करताना या निर्णयावर न्यायालयानं सेंगरला दोषी ठरवलं. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण लखनऊहून दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं होतं. न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी 5 ऑगस्टपासून या प्रकरणावर प्रतिदिन सुनावणी सुरू केली होती.

न्यायालयानं बाल लैंगिक अपराधांचे संरक्षण(पॉक्सो) कलम 3 4, (अल्पवयीनशी दुष्कर्म) आणि भादंवि कलम 120बी (गुन्हेगारी कट), 363 (अपहरण), 366 (अपहरण आणि महिलेवर विवाहासाठी दबाव टाकणं), 376 (दुष्कर्म) असे गुन्हे निश्चित केलेले आहेत.  4 जून 2017ला नोकरी देण्याच्या बहाण्यानं सेंगरनं सहकारी शशी सिंह हिच्यासोबत मिळून कट रचला आणि 16-17 वर्षांच्या तरुणीशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Web Title: Then Kuldeep Singh Sanger would have been acquitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.